“लसीकरण हाच महामारीवर उपाय”

“लसीकरण हाच महामारीवर उपाय”

लाटांवर लाटा या महामारीच्या यायला लागल्या आहेत.
पहिल्या लाटेत “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या नियमाप्रमाणे आणी निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी यामुळे महामारीची तीव्रता कमी झाली
दुसर्या लाटेत सतत वाढणारी रुग्णसंख्या व मोठ्या प्रमाणात होणारे मृत्यू यामुळे लसीकरण हाच एकमेव उपाय आहे.

WhatsApp Image 2021 05 09 at 5.37.09 PM 2


आदिवासी भागात आदिवासी बांधवांची स्वत:च्या आरोग्या विषयी अनास्था व लसीकरणा बद्दल गैरसमजुती यामुळे आदिवासी भागात लसीकरणाची मोहीम ही संथ गतीने सुरू आहे.
आता गरज आहे ती फक्त सुजाण व सज्ञान नागरिकांनी लसीकरणा विषयी योग्य ते समुपदेशन (COUNSELING)व लसीकरणाचे फायदे या विषयी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे
यामुळे आता तरुण युवकांनी (१८-४५) बाहेर पडुन लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे.
त्याच बरोबर आपल्या वडिलधाऱ्या लोकांना लसीकरणा विषयी जागृत करून जास्तीत- जास्त लसीकरण करणे हाच उपाय आहे.
दुसर्या लाटेत “महामारी” आहे हे माहीत असूनही या महामारीची लक्षणे अंगावरच काढल्यामुळे कितीतरी लोकांनी आपल्या आप्तेष्टांचे म्रुत्यू बघीतलेले आहेत.
यामुळे आरोग्य यंत्रणेवर खुपच ताण पडलेला आहे.
लक्षणे दिसल्यास ताबडतोब दवाखान्यात जाऊन उपाय व उपचार करून घ्यावेत.

WhatsApp Image 2021 05 09 at 5.37.09 PM 1 1


आपल्या पुर्वजांनी अशा अनेक नैसर्गिक लाटा अंगावर झेलून वेळेवर योग्य ते उपाय व उपचार करून वर्षोनुवर्षे जंगलात तग धरून आहेत.
परंतू आता ज्या येणाऱ्या लाटा यांना थोपवणारा एकच उपाय म्हणजे लसीकरण.
लसीकरण करून घेणे हाच आहे सर्वौत्तम उपाय !!
महामारीस करुनी दोन हात होईल सफाई.!!!


डॉ.दिपक चौधरी (आदिवासी रत्न पुरस्कार महाराष्ट्र शासन २०१९).

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत