रोहितशिवाय मुंबई मैदानात, चेन्नईसाठी ‘करा या मरो’ची लढाई

रोहितशिवाय मुंबई मैदानात, चेन्नईसाठी ‘करा या मरो’ची लढाई

शारजाह, 23 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या आजच्या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)ची टीम कर्णधार रोहित शर्माशिवाय मैदानात उतरली आहे. रोहितऐवजी कायरन पोलार्डकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. या मॅचमध्ये मुंबईने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माऐवजी सौरभ तिवारीला मुंबईच्या टीममध्ये संधी देण्यात आली आहे. तर चेन्नईने शेन वॉटसनच्याऐवजी इम्रान ताहिरला संधी दिली आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम तिसऱ्या तर चेन्नई शेवटच्या क्रमांकावर आहे. प्ले-ऑफचं आव्हान कायम ठेवण्यासाठी चेन्नईला या मॅचमध्ये विजय मिळवणं गरजेचं आहे.

मुंबईची टीम

क्विंटन डिकॉक, सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, नॅथन कुल्टर नाईल, राहुल चहर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह

चेन्नईची टीम

सॅम करन, फाफ डुप्लेसिस, अंबाती रायुडू, एन जगदीशन, एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड, रविंद्र जडेजा, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, जॉस हेजलवूड, इम्रान ताहिर

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत