रोज प्या ‘तुळशीचं दूध’; Stress जाईल पळून! कसं करायचं, कधी प्यायचं?

रोज प्या ‘तुळशीचं दूध’; Stress जाईल पळून! कसं करायचं, कधी प्यायचं?

तुळशीची (Tulsiपानं औषधी गुणांसाठी ओळखली जातात. तुळशीच्या पानांनी इम्युनिटीच (Immunity)वाढत नाही तर, अनेक प्रकारच्या गंभीर आजारातही (Serious Illness) फायदा होतो. कोरोना (Corona) साथीच्या काळात लोक तुळशीच्या पानांचा काढा पिऊन आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करत आहेत.

पण, तुळशीची पानं कच्ची खाण्याबरोबर ती  दुधात उकळून प्यायल्यास अधिक फायदेशीर ठरतात आणि आपल्याला बर्‍याच आजारांपासून दूरही ठेवतात. तुळशीचं दूध (Tulsi Milk) प्यायल्यास आपण कोणत्या आजारांपासून बचाव करू शकतो? आणि ते तयार करण्याची योग्य पद्धत कोणती? आणि ते पिण्याची योग्य वेळ कोणती? आहे ते पाहुया.

तुळशीच्या दुधाचं सेवन कसं करावं?

तुळशीचं दूध बनवण्यासाठी आधी दीड ग्लास दूध उकळावावं. दूध उकळल्यानंतर त्यात 8 ते 10 तुळशीची पानं घालावीत आणि आणखी काही वेळ उकळवून आर्धा ग्लास करावं. दूध कोमट असताना प्यावं. हे दुध नियमित प्यायल्यास प्रतिकारशक्ती वाढेल आणि बर्‍याच प्रकारच्या आजारांपासून बचाब होईल.

मायग्रेनमध्ये आराम

तुळशीची पानं दुधात उकळवून प्यायल्याने डोकेदुखी किंवा मायग्रेनसारख्या आजारांमध्ये आराम मिळतो. बराच काळ मायग्रेनचा त्रास असेल तर, दररोज चहाऐवजी दुधात तुळशीची पानं घालून उकठळून प्यावी.

स्ट्रेस होईल कमी

तुळशीच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतात. ऑफिसच्या कामामुळे  तणाव येत असेल किंवा कौटुंबिक कलहामुळे डिप्रेशन वाढलं असेल तर, दुधात तुळशीची पानं उकळून प्यावी. असं केल्याने डिप्रेशनचा त्रास कमी होईल.

रोग प्रतिकारशक्ती वाढते

कोरोना साथीच्या काळात प्रत्येक व्यक्ती आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याकडे लक्ष देत आहे. जेव्हा आपली रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असते तेव्हाच,कोणताही रोग आपल्यावर हल्ला करतो. तुळशीच्या पानांमध्ये असलेलं ऍन्टीऑक्सिडेंट शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतं. याशिवाय तुळशीमध्ये असणारे ऍन्टीबॅक्टीरियल आणि ऍन्टीवायरल गुणधर्म सर्दी,खोकल्यापासून बचाव करतात.

हृदयाची काळजी

तुळशीची पानं दुधात उकळवून प्यायल्यास हृदय निरोगी राहतं. दररोज रिकाम्या पोटी तुळशीचं दूध प्यायल्यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांना भरपूर फायदा होतो.

दम्याच्या आजारात फायदा

श्वासोच्छवासासंबंधी त्रास होत असेल तर तुळशीचं दूध नक्कीच प्या. ही होम रेमेडी बदलत्या हवामानामुळे होणार्‍या त्रासांपासून आपल्याला दूर ठेवते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत