रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याकरिता दररोज सकाळी आद्रक मध आणि लिंबाच्या पाण्याचे सेवन करा

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याकरिता दररोज सकाळी आद्रक मध आणि लिंबाच्या पाण्याचे सेवन करा

मुंबई,(दि.०६ मे २०२१): कोरोनाच्या काळात आजारांपासून दूर राहणे गरजेचे झाले आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे चांगली रोगप्रतिकारक शक्ती यासाठी आपल्याला चांगला आणि हेल्थी आहार घ्यावा लागणार आहे. जेणे करून आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास नक्की मदत होईल.

-मध

OIP 1 6

-लिंबू

lemons

-आद्रक

ginger

-पाणी

Rc1abf0dc4d0c85de9ba4b02c8f47f916

सर्वात अगोदर पाणी गरम होण्यासाठी मंद आचेवर ठेवा. त्यानंतर यामध्ये आद्रक आणि मध घाला. साधारण 20 ते 25 मिनिटे हे उकळूद्या आणि त्यानंतर यामध्ये लिंबू घाला आणि प्या. मध खनिजे, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांचा संग्रह आहे. रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्याव्यतिरिक्त, मध अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यात देखील प्रभावी आहे. आयुर्वेदात याचा उपयोग सर्व रोग बरे करण्यासाठी केला जातो.

खोकल्याचा त्रास बराच काळ बरा होत नसेल, तर मधाचे सेवन करणे खूप उपयुक्त ठरू शकते. मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात, जे संसर्ग रोखतात. तसेच, मध कफ सहजपणे काढून टाकतो. आपण एखादा चमचा नुसता मधही खाऊ शकता. याशिवाय आल्याच्या रसामध्ये मध मिसळून खाल्याने कफ आणि खोकल्यात खूप आराम मिळतो.

लिंबामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ची मात्रा अधिक असते. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते. लिंबामध्ये औषधी गुणधर्मही आहेत. थकवा दूर करण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी लिंबाचा उपयोग केला जातो. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तर दररोज आहारामध्ये लिंबाचा समावेश करणे आवश्यक आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी लिंबू अत्यंत फायदेशीर आहे.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळद अतिशय गुणकारी आहे. हळदीमध्ये अँटीव्हायरल, अँटीफंगल गुण असतात. ज्यामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या विकारावर हळद गुणकारी ठरते. तसेच आजार लवकर बरा होण्यासही मदत मिळते. हृदय निरोगी ठेवण्यासाठीही हळद अतिशय प्रभावी ठरते. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हळदीचे दूध आपल्या रक्तातील साखरेची पातळी संतुलित करते. ज्यामुळे आपले आरोग्य देखील निरोगी राहते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत