रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा पर्याय – “आल्याची वाडी”

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा पर्याय – “आल्याची वाडी”

Alternatives to boost the immune system - "Gingerbread"

सर्दी आणि खोकला हे रोग पावसाळ्यात डोके वर काढतात. सर्दी खोकला हे जरी सामान्य रोग असले तरीही त्यासाठी रोगप्रतिकार क्षमता बळकट केल्याने आपण या रोगापासून बचाव करू शकतो आणि यासाठी उत्तम पर्याय म्हणजे आली “आल्याची वाडी”

आल्याचे फायदे-
आले हे औषधी आहे. तसेच जलन याला आराम मिळतो. पित्त होण्यापासून रोखले जाते आल्यामुळे तोंडात लाळेची निर्मिती जास्त प्रमाणात होते.सर्दी व कफावर तुळशीच्या पानांबरोबर आल्याचा किस उकळून प्यावा

साहित्य-
200/300 ग्राम आलं, 300 ग्राम साखर, 2 चमचे साजूक तूप, 10/15 वेलचीच्या पाकळ्या, 2 चमचे दूध,

कृती-
सर्वप्रथम आलं घ्या आणि त्याला मिक्सरमध्ये दूध घालून वाटून पेस्ट बनवा.
एका पॅनमध्ये १ चमचा तूप गरम करा आणि आल्याची पेस्ट घाला आणि ५ मिनिट मध्यम आचेवर हलवा.
या मध्ये साखर आणि वेलची पूड करून घाला.
एका ताटलीत बटर पेपर लावा आणि त्यावर थोडा तुपाचा हात लावा.
मिश्रण पॅनमध्ये घट्ट झाल्यावर गॅस बंद करून घ्या.
मिश्रण ताटलीत पसरवून घ्या.
मिश्रण थंड झाल्यावर सुरीने वडी कापून घ्या.
आलेपाक वडी तयार आहे.
ही वडी एका डब्यात भरुन ठेवल्यावर २ महिने ही खराब होणार नाही.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत