रेमडिसिव्हर चा काळा बाजार करणारा निघाला त्याच कंपनीतील कामगार

रेमडिसिव्हर चा काळा बाजार करणारा निघाला त्याच कंपनीतील कामगार

कमला लाईफ सायन्स लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्यानी कोणाच्या सांगण्यावरून केला रेमिडीसिवरचा काळाबाजार;???

तारापुर/बोइसर : राज्यात रेमडीसीव्हर चा तोटा असताना तारापूर एम आई डी सी तील कमला लाईफ सायन्स या कंपनीत काम करणाऱ्या उमरोली येथील रहिवासी असलेला सिद्धेश पाटील या युवकाने राज्यात इतर जिल्ह्यात असलेला तोटा लक्षात घेऊन आपण काम करत असलेल्या कंपनीतील रेमडेसिव्हर ची इंजेक्शन हि चोरी छुप्या पद्धतीने काढून ती इतर जिल्ह्यात चढ्या भावाने अवैध विक्री करीत असल्याचे नाशिक पोलिसांना आढळुन आले, आणि या सर्वाचा माग काढत नाशिक पोलीस पालघर जिल्ह्यात आले, त्यांनी काळ्या बाजारातील रेमडेसिव्हर नाशिक ला कुठून उपलब्ध झाली त्या माहितीच्या आधारे पालघर बोईसर रोड वरील उमरोली येथे बोईसर येथील कमला लाईफ सायन्स या रेमडिसिव्हर बनवणाऱ्या कंपनी मध्ये काम सिद्धेश पाटील या युवकास चौकशी साठी ताब्यात घेतले आहे.

तसेच त्याच्या चौकशीमध्ये काय समोर येते ते पाहणे गरजेचे आहे. कडक सुरक्षा व्यवस्था असताना कंपनीच्या बाहेर हे इंजेक्शन गेले कसे ते ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर याचे वितरण काळ्या बाजारात झाले कसे ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्तीत होत आहेत, कंपनी व्यवस्थापनाने या विषयी बोलण्यास नकार दिला आहे.

जिल्ह्यासह राज्यात रेमडेसिव्हर ची रुग्णांना आवश्यकता असताना या मध्ये कंपनीने केंद्र सरकार वर जबाबदारी झटकून मोकळी झाली होती, आणि कंपनीचा कामगार हा हे इंजेक्शन काळ्या बाजारात विकताना सापडल्या मुळे कंपनीची मोठी गोची झाली आहे.

या बाबतीत तपास चालू आहे, कंपनीच्या कामगारा कडे ६३ रेमडेसिव्हर इंजेक्शन हस्तगत करण्यात आली आहेत, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत