राहुल गांधींनी टाकले मिल्खा सिंहचे ट्विट आणि झाले ट्रोल

राहुल गांधींनी टाकले मिल्खा सिंहचे ट्विट आणि झाले ट्रोल

Rahul Gandhi posted Milkha Singh's tweet and became a troll

महान धावपटू मिल्खा सिंह यांचे १८ जून रात्री ११. ३० च्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच अनेक दिग्ग्ज मंडळींनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. मिल्खा सिंहच्या निधनाचे दुःख व्यक्त करत अभिनेत्यांपासून ते राजकीय मंडळींपर्यंत सर्वांकडून ट्विटरवर पोस्ट टाकण्यात आली आहे. राहुल गांधींनी देखील मिल्खा सिंह यांच्या निधनाची बातमी समजताच ट्विटरवर पोस्ट करून त्यांना सद्धांजली वाहिली. मात्र इंग्रजीममध्ये केलेल्या या पोस्टमध्ये एका चुकीच्या शब्दामुळे राहुल गांधींना नेटकऱ्यांच्या ट्रोलला सामोरे जावे लागले.

फ्लाईंग शिख मिल्खा सिंग यांच्या निधनाचं वृत्त कळाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनी त्यांना ट्विटद्वारे श्रद्धांजली वाहिली. ट्वीटमधील एका शब्दप्रयोगावर आक्षेप घेत अनेकांनी राहुल गांधींना ट्रोल केले असून याबाबत त्यांची थट्टा करण्यात आली आहे. मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर ट्वीट करत राहुल गांधी म्हणाले की, “मिल्खा सिंगजी फक्त प्रसिद्ध क्रीडापटूच नव्हे तर लवचिकता आणि समपर्ण यासाठी ते लाखो भारतीयांचे प्रेरणास्त्रोत होते. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि मित्र परिवारांच्या दुःखात मी सहभागी आहे. भारत नेहमीच आपल्या फ्लाईंग शिखचं स्मरण करत राहिल”.

राहुल गांधींच्या पोस्टमधील हे शेवटचे वाक्य ‘India remembers her #FlyingSikh’ असे असून या वाक्यात Her या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. यासंदर्भात नेटकऱ्यांकडून राहुल गांधी यांच्या इंग्रजीबद्दलच्या ज्ञानाची थट्टा उडवण्यात आली आहे. या ट्विटमुळे राहुल गांधींना अनेकांनी ट्रॉल केले आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत