राष्ट्रीय शिक्षक दिन शिक्षक सन्मान सोहळा २०२१

राष्ट्रीय शिक्षक दिन शिक्षक सन्मान सोहळा २०२१

राष्ट्रीय शिक्षक दिनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खारघरमधील शिक्षकांचा सत्कार

WhatsApp Image 2021 09 06 at 11.54.38 AM 1

खारघर: ५ सप्टेंबर,दीपक शिंदे.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा करण्यात येते. या राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून खारघर तळोजा शहरातील विविध शाळेतील २० शिक्षकांचा सत्कार भारतीय जनता पार्टी, शिक्षक सेल खारघर मंडलाच्या वतीने करण्यात आला.
उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष, पनवेल विधानसभेचे आमदार सन्माननीय प्रशांतजी ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत खारघरमधील २० शिक्षकांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व प्रेरणादायी पुस्तक देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

ग्रीन फिंगर ग्लोबल – अनिता चौधरी,
न्यू सिटी इंटरनॅशनल – शुभांगी चौरे,
रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स – प्रिन्सिपॉल दुर्गा मौर्या,
गोखले स्कुल -गौरी शिंदे,
डीएव्ही – रश्मी जोशी,
सिनर्जी चे राहुल व अभिषेक अरोरा सर,
ज्ञानज्योत कॉलेज – संदीप डोंगरदिवे,
सिजेएम स्कुल – संतोष पवार,
हार्मोनी स्कुल, सेक्टर ३६ – अंजु सलारीया,
रेड क्लिफ स्कुल – वर्षा गणेशकुमार,
आर.आय.सी – प्रणाली जाधव
ब्राईट किड्स स्कुल – उमेरा खान
जि.प.,शाळा मुर्बी – अनिता शिर्के,
ब्युटीफुल टूमारो फाउंडेशन – रुपल धनेशा,
सामाजिक शिक्षिका – आयेशा अन्वर खान,
अपीजय स्कुल – संजना चव्हाण,
हार्मोनी सेक्टर ५ – सस्मिता रौत्री,
ब्राईट किड्स स्कुल – नाझनीन खान
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल- सुजाता जाधव,
ह्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

WhatsApp Image 2021 09 06 at 11.54.38 AM 3


याप्रसंगी सन्मानित शिक्षकांचे कौतुक करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, आपल्या जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरूचा वाटा खूप मोठा असतो. व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे. शिक्षणाचे महत्त्व सांगताना ते पुढे म्हणाले की जिथे शिक्षण आहे तिथेच विकास आहे.
ह्या अनुभवी व गुणी शिक्षकांनी त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याला सन्मान केल्याने खऱ्या अर्थाने न्याय मिळाला व भविष्यात अजून कार्य करण्याला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
सन्मान सोहळ्यानंतर खारघर मंडल शिक्षक सेलच्या सदस्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आले.
ह्याप्रसंगी मा.सभापती अभिमन्युशेठ पाटील, प्रभाग समिती अ च्या सभापती अनिता पाटील, नगरसेवक हरीश केणी, मा.सभापती व प्रभाग ५ चे नगरसेवक शत्रुघ्न काकडे, नगरसेवक ऍड.नरेश ठाकूर, नगरसेविका नेत्रा पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील, मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष दिलीप जाधव व रमेश खडकर, समीर कदम, सोशल मीडिया संयोजिका मोना अडवाणी, महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, महिला मोर्चा उपाध्यक्षा आशा बोरसे, किरण पाटील, ऍड.राजेंद्र अग्रवाल, नवनीत मारू, प्रभाकर बांगर, अश्विनी भुवड, आशा शेडगे, शोभा मिश्रा, उमेरा खान, नाझनिन खान, विजय बागडे, अक्षय पाटील, फुलाजी ठाकूर, कांचन बिर्ला, अनु अन्सारी, सीमा खडसे, विलास आळेकर, निर्मला आळेकर, सचिन वासकर, प्रिया दळवी, विपुल चौतालिया, नरेश पांचाळ, अशोक जंगीड, निर्मला यादव, सुशीलाजी, विजयालक्ष्मी सरकार, हंसा पारघी, नवीन दुबे, श्रीकांत जावळे, संतोष भारते इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन खारघर मंडल शिक्षक सेलच्या वतीने करण्यात केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक शिंदे यांनी केले, प्रास्ताविक सेल चे अध्यक्ष संदीप रेड्डी व आभार प्रदर्शन ब्रिजेश पटेल यांनी केले.

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत