राज्यात १ मे पासून मोफत लसीकरण सुरु होणार नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात १ मे पासून मोफत लसीकरण सुरु होणार नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय आज बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पण लसींच्या कमतरेमुळे १ मे पासून हे मोफत लसीकरण सुरु करता येणार नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केले. याचाच अर्थ १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण लांबणीवर पडले आहे.

15 मे पर्यंत राज्यातील लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) कायम राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोना रूग्णांची संख्या स्थिर असली तरी कमी होत नसल्यानं लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन कालावधी वाढवण्यावर शिक्कामोर्तब झालंय. 
 सध्या दोनच लसी उपलब्ध आहेत, 10 लाख लस देण्याचे कोविड व्याक्सिन मान्य केलं आहे. एक कोटी लस देण्याचे कोविडशिल्डने तोंडी मान्य केलं आहे. दर महिन्याला 2 कोटी लस द्यावे लागतील , तेवढी क्षमता राज्याची आहे, 12 लाख डोस दररोज देता येईल अशी क्षमता असल्याचे ते म्हणाले.
अपुऱ्या पुरवठ्यामुळे 1 मे ला लसीकरण सुरू होणार नसल्याचे टोपे म्हणाले. 

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत