रस्त्याचे काम सुरु असताना १ कोटी हुन अधिक पैसे सय्यद कंस्ट्रक्शनच्या खिशात

रस्त्याचे काम सुरु असताना १ कोटी हुन अधिक पैसे सय्यद कंस्ट्रक्शनच्या खिशात

रस्त्याचे काम सुरु असताना १ कोटी हुन अधिक पैसे सय्यद कंस्ट्रक्शनच्या खिशात

जिल्हा प्रतिनिधी-तालुका प्रतिनिधी मंठा

जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना दि. 8 जुलै 2021 रोजी प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना यांनी निवेदन देऊन सय्यद कंस्ट्रक्शन विरोधात कारवाई करावी अशी मागणी केली आहे. निवेदनात त्यांनी असे लिहिले आहे कि, ‘ जिल्हाधिकारी साहेब या गंभीर विषयावर आपले लक्ष वेधू इच्छितो की, जालना जिल्ह्यातील, 2016 ते 2017.या कालावधीमध्ये शेगाव ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली होती मग याच कालावधीमध्ये सय्यद कंट्रक्शन एजन्सीने हे काम कसे केले कुठे केले असा प्रश्न उपस्थित होत आहे, म्हणून सा.बां.उपविभाग मंठा कार्यालयामार्फत 2016-2017 या कालावधीमध्ये सय्यद कंट्रक्शन एजन्सीने, नियोजित कट रचून या राज्य महामार्ग 221 खामगाव,मेहकर,लोणार,तळणी,मंठा, जालना जिल्ह्याच्या हद्दीपासुन मंठा या रस्त्यावर काम केल्याचे दाखवून 1 कोटी, 22 लाख, 52 हाजार,504 रुपये काम न करताच सगळी रक्कम हडप केली, याची सखोल चौकशी करून या एजन्सीला ब्लॅकलिस्ट संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, कारण 2016-2017 या कालावधीमध्ये राष्ट्रीय महामार्ग शेगाव ते पंढरपूर क्रमांक 548 या राष्ट्रीय महामार्गावर मंजुरी मिळाली होती, काम चालु झाले होते.

या रस्त्याचे का कालावधीमध्ये मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हैदराबाद. या कंपनीला या रस्त्याचे काम देण्यात आले होते, मग या रस्त्यावर,1.कोटी,22 लाख,रुपये कधी खर्च केले कोणी खर्च केले, या रस्त्यावर हा खर्च कागदोपत्री दाखवला रस्त्याचे काम न करताच पूर्ण पैसे हडप केले, हे बोगस काम करण्यासाठी बोगस कार्यारंभ आदेश दि.7 डिसेंबर 2016,दिला 2016 च्या बाराव्या महिन्यात कार्यारंभ आदेश दिला 2017 मध्ये शेगाव पंढरपूर रस्त्याचे काम चालू झाले मग 1 कोटी, 22 लाख, रुपये कुठे खर्च केले, अशाप्रकारे कागदोपत्री काम न करता बोगस काम केल्याचे दाखवून पैसे हडप केले,जालना जिल्ह्यातील परतूर मंठा तालुक्यातील अनेक बोगस कामे करून सय्यद कंट्रक्शन ने कोट्यावधी रुपये हडप केले म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहितार्थ पक्ष म्हणून मागणी करीत आहोत,सय्यद कंट्रक्शन या एजन्सीला तत्काळ ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची कारवाई करण्यात यावी सय्यद कंट्रक्शन ला सहकार्य करणारे अधिकारी यांच्यावर कठोर कार्य कारवाई करण्यात यावी ही अपेक्षा.जालना जिल्ह्यातील तालुका मंठा येथील.सा.बां. उपविभाग मंठा कार्यालयामार्फत शेगाव ते पंढरपूर रस्त्याचे काम होणार होते, मग यांनी 1.कोटी, 22 लाख, रुपये कुठे खर्च केले कारण हे पैसे हडप केले काम न करताच सय्यद कंट्रक्शन एजन्सीने व उपअभियंता मंठा. कनिष्ठ अभियंता मंठा‌. यांनी संगनमत करून 1.कोटी, 22.लाख, रुपये नियोजित कट रचून हडप केले, याची चौकशी करून संबंधित एजन्सीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून संबंधित कॉलिटी कंट्रोल अधिकारी.उप अभियंता मंठा. कनिष्ठ अभियंता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, योग्य ती कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे स्टाईल आंदोलन अथवा उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी शेवटी असा इशारा देखील मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी दिली.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत