रक्त दान सर्वश्रेष्ठ दान.

रक्त दान सर्वश्रेष्ठ दान.

आपन नैसर्गिक पद्धतीने सगळ निर्माण करु शकतो पण रक्त निर्माण करु शकत नाही. या विचाराला पुढे सावरत जागतिक रक्त दान दिवस साजरा केला जातो. कोरोना काळात तर रक्ताची खुप कमी आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले जातात. दान केलेल रक्त एका माणसाचे आयुष्य वाचवू शकतो. माणसाला मृत्यू पासून वाचवू शकतो. जगात सर्वात महत्त्वाचे दान हे रक्त दान मानले जाते.

अनेक लोक रक्त दान करण्यासाठी पुढाकार घेतात पण अनेक गैरसमज देखील आपल्या समाजात आहे. माझ्या रक्ताने एखाद्याचे जगणे सोपे होऊ शकते. या विचारानं रक्त दान केले पाहिजे.

मला असे वाटते की सामाजिक भान म्हणून प्रत्येक माणसाने रक्त दान करावे जेणेकरून रक्ताचा पुरवठा करणे सोपे होऊन जाणार. जमेल तेव्हा रक्त दान केलेच पाहिजे.

आपल्या आजूबाजूला जिथे कुठे रक्तदान शिबिर सुरू असेल तिकडे जाऊन रक्तदान करा. लेखाच्या शेवटाला एवढंच म्हणेल की दान केलेलं कधी वाया जात नाही हे विसरू नका.

सदाफ फातिमा शेख, ९वी
छत्रपती शिवाजी विद्यालय, सायन
सलाम बॉम्बे फाउंडेशन, मिडीया अकादमी

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत