युएईत होणार टी -20 वर्ल्ड कप

युएईत होणार टी -20 वर्ल्ड कप

UAE to host T20 World Cup

ICC T-20 World Cup 2021 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरुषांची आयसीसी टी -20 वर्ल्ड कप स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये होणार असण्यावर आज (29 जून) आयसीसीने शिक्कामोर्तब केले आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा युएई आणि ओमान येथे होणार असून याचे यजमानपद (बीसीसीआय) भारताकडे असणार असल्याची माहिती आयसीसीने दिली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टी 20 वर्ल्डकप भारताबाहेर होणार हे आधीच बोललं जात होतं. दुबईत ही स्पर्धा हलवली जाऊ शकते अशीही चर्चा होती, ती खरी ठरली. आयपीएल स्पर्धा संपताच टी – 20 वर्ल्डकप सुरु होईल असा अंदाज वर्तवला जात आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत