या चार बँकांना आरबीआयने ठोठावला दंड

या चार बँकांना आरबीआयने ठोठावला दंड

RBI imposes penalty on these four banks

नवी मुंबई- नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व बँक ऑफ इंडियाने चार सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. हैदराबाद मधील आंध्रप्रदेश महेश को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक, आमदाबाद मार्केन्टाईल को-ऑपरेटिव बँक एसव्हीसी सहकारी बँक, सारस्वत सहकारी बँक अशा चार बँकांना RBI ने दंड ठोठावला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी दि. 29 जून रोजी हैदराबादमधील आंध्र प्रदेश महेश को- ऑपरेटिव्ह अर्बन बँकेवर ११२. ५० लाखांचा दंड आकारला. त्याचप्रमाणे भारतीय रिझर्व बँकेने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अहमदाबाद मर्केंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेवर ६२. ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला असून मुंबईच्या एसव्हीसी सहकारी बँकेवर ३७. ५० लाख रुपये आणि सारस्वत सहकारी बँकेवर २५ लाख रुपयांचा दंड आरबीआय कडून आकारण्यात आला आहे.

WhatsApp Image 2021 06 30 at 10.18.13 AM

केंद्रीय बँकेनुसार आंध्र प्रदेश महेश को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेवर ‘ठेवीवरील व्याज दर’ (Interest Rate on Deposits)आणि ‘आपले ग्राहक ओळखा’ (Know Your Customer)या संदर्भात आरबीआय निर्देशांचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अहमदाबाद मर्केंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेला ‘ठेवीवरील व्याज दरा’वरील मास्टर निर्देशात असलेल्या निकषांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारण्यात आला आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत