या खेळाडूने कमावले एका दिवसात ७४३ कोटी

या खेळाडूने कमावले एका दिवसात ७४३ कोटी

this player earned 743 crore in one day

नवी मुंबई- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वात महाग खेळाडूंपैकी एक आहे. फोर्ब्सच्या माहितीनुसार, विराट कोहलीची वर्षाला जवळपास २०० कोटी रुपये कमाई होते. मात्र एका खेळाडूने चक्क एका दिवसात ७४३ कोटी रुपये कमावले. या खेळाडूचे नाव फ्लॉयड मेवेदर असे असून हा एक अमेरिकेचा महान प्रोफेशनल बॉक्सर आहे. मेवेदर याने स्वतः इस्टाग्रामवरून ही माहिती दिली. त्याने मागील महिन्यात यूट्यूबर लॉगन पॉल याच्यासोबत झालेल्या सामन्यातून १०० मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास ७४३ कोटी रुपये कमावले.

मेवेदर आणि लॉगन पॉल यांच्यात ६ जूनला हा सामना झाला होता. हा सामना ८ राऊंड चालला आणि मेवेदर यूट्यूबर पॉलला नॉक आऊट करू शकला नाही. या सामन्यानंतर मेवेदरवर टीका झाली होती. मेवेदरने २०२०मध्ये ४५० मिलियन डॉलर कमावले होते. मात्र त्याने दावा केला होता की याचवर्षी त्याने ८९.१३ अरब रुपये कमावले आहेत. मेवेदरकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. बुगाती ग्रँड स्पोर्ट, बुगाती वेरॉन, लँम्बॉर्गीनी एवॅटेडॉर, फेरारी ५९९ जीटीबी फियोरानो अशा अनेक गाड्या आहेत.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत