मोलमजुरी करणाऱ्या पालकांची मान उंचावली

मोलमजुरी करणाऱ्या पालकांची मान उंचावली

Raised the dignity of the parents who were mercenaries

फलटण : साताऱ्यामधील फलटण तालुक्यातील सरडे गावातील एका मजूर आईवडिलांच्या पोटी जन्मलेल्या प्रवीण जाधव याची ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. पंतप्रधान मोदींनी देखील आज आपल्या मन की बात या कार्यक्रमात साताऱ्याच्या प्रवीण जाधवचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.प्रवीणला क्रीडा प्रबोधिनी अमरावती येथे सिलेक्शन करण्यासाठी प्राथमिक शिक्षक विकास भुजबळ व शुभांगी भुजबळ यांनी अथक प्रयत्न केले. तो धनुर्विद्या खेळाडू म्हणून सुरुवात करताना प्रशिक्षक म्हणून काम केलेले प्रफुल डांगे (क्रिडा प्रबोधनी, अमरावती) त्यानंतर रणजीत चांमले (पुणे) व आत्ता आर्मी इन्स्टिट्यूट पुणे आणि भारतीय धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे या सर्वांचे मार्गदर्शन व प्रवीणचे खडतर प्रशिक्षण यामुळं त्यानं ऑलिम्पिकमध्ये धडक मारली.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत