मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार

मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार

Modi government's cabinet expansion

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या म्हणजे बुधवारी संध्याकाळी 6 वाजता पार पडणार आहे. या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण मंत्रिमंडळ असेल. कारण या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे, यामुळे मंत्रिमंडळाचे सरासरी वय खूपच कमी होईल, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.

मंत्रिमंडळ कसे असेल?

मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून महिलांचे प्रतिनिधित्व वाढविले जात आहे. प्रोफेशनल, मॅनेजमेंट, एमबीए, पदव्युत्तर युवा नेत्यांचा मंत्रिमंडळा समावेश होण्याची शक्यता आहे. मोठ्या राज्यांना अधिक वाटा देण्यात येईल. बुंदेलखंड, पूर्वांचल, मराठवाडा, कोकण या भागांना वाटा देण्यात येईल अशी चर्चा आहे.

मंत्रिमंडळात लहान समुदायांना देखील प्रतिनिधित्व दिले जात आहे. यावेळी यादव, कुर्मी, जाट, पासी, कोरी, लोधी इत्यादी समाजाचे प्रतिनिधित्व दिसेल. या विस्तारानंतर दोन डझन ओबीसी किंवा मागासवर्गीय मंत्री यावेळी मंत्रिमंडळात दिसतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

अनेक मंत्रिपदं रिक्त

शिवसेना आणि अकाली दल एनडीएमधून बाहेर निघाले तसेच रामविलास पासवान व इतर काही मंत्र्यांच्या निधनानंतर सर्व मिळून अनेक मंत्रिपदे रिक्त आहेत. सध्या मोदी मंत्रिमंडळात फक्त 53 मंत्री आहेत. तर घटनेनुसार मंत्र्यांची संख्या जास्तीत जास्त 79 असू शकते. त्यामुळे सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात 26 मंत्रिपदं रिक्त आहेत. तिथे कुणाची वर्णी लागणार येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल.

JEE Main 2021 परीक्षेच्या तारखा जाहीर

नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे( NTA)घेण्यात येणाऱ्या JEE Mains -2021 परीक्षेच्या उर्वरित तिसऱ्या आणि चौथ्या सेशनच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये JEE Main 2021 तिसऱ्या सेशनची परीक्षा 20 जुलै ते 25 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. तर चौथ्या सेशन ची परीक्षा 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान देशभरात आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेच्या तारखा आज केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहीर केल्या आहेत

देशातील कोरोना परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांना जेईई मेन्स परीक्षेसाठी चार सेशन ठेवण्यात आले होते. जेणेकरून विद्यार्थ्यांना अधिकची संधी परिक्षेसाठी मिळेल. यामध्ये ही परीक्षा फेब्रुवारी,मार्च, एप्रिल , मे या महिन्यात 4 सेशनमध्ये पार पडणार होती. त्यात फेब्रुवारी, मार्च महिन्यातील परीक्षा पूर्ण झाल्या असून दुसऱ्या लाटेत देशभरातील कोरोना स्थिती पाहता एप्रिल आणि मे महिन्याच्या म्हणजेच तिसऱ्या आणि चौथ्या सेशनच्या परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता या परीक्षा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना यावर्षी जेईई मेन्स 2021 परीक्षेसाठी चार संधी देण्यात आल्या आहेत. ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त होतील त्या परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत