मोठी बातमी : आयपीएल स्पर्धा रद्द

मोठी बातमी : आयपीएल स्पर्धा रद्द

खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी बीसीसीआयचा निर्णय

मुंबई : आयपीएल स्पर्धेदरम्यान कोलकाता संघाचे दोन खेळाडू प्रथम कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर चेन्नई संघाचे तीन स्टाफ मेम्बर्स पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर स्पर्धेतील कोलकाता संघाचा सामना रद्द करण्यात आला होता.

त्यातच आज दिल्ली संघाचा एक व हैदराबाद संघाचा एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे संपूर्ण आयपीएल स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय बीसीसीआयने घेतला असून आयपीएल स्पर्धेच्या स्थगितीची घोषणा आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी केली आहे.

खेळाडू अन्य स्टाफ व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत