मैत्री दिवस

मैत्री दिवस

आयुष्यात खुप मित्र मैत्रिणी असतात पण जवळची काही मोजकीच असतात ज्यांना आपल्या भावना खुप महत्त्वाच्या असतात. जगण्यासाठी आयुष्यात मैत्री खुप महत्वाचं आहे. चांगले मित्र मैत्रिणी खुप कमी असतात पण त्यांना न विसरण्या सारखे असतात. आज मैत्री दिवशी चांगल्या आणि आयुष्य सोबती म्हणून असणार्या सर्वांना खूप शुभेच्छा.

मैत्री टिकून ठेवण्यासाठी विश्वास खूप महत्त्वाचा असतो असे मला वाटते. मैत्री कोण ही करु शकतो पण या नात्याला टिकवण तेवढंच कठिण सुद्धा आहे असं मला वाटतं पण विश्वास असेल तर मैत्री बहरत जाते.

रक्ताची नाती नसली तरी ती जपता येतात. आनंद देणारे क्षण सुद्धा मैत्री या नात्यात भरपूर असतात. मैत्री या नात्याला अनुभवण्यासाठी मैत्री केली पाहिजे. ती मैत्री कोणासोबत ही करु शकतो ‌आई, ताई, बाबा शाळेतल्या विद्यार्थी किंवा शिक्षक सुद्धा.

या मैत्री दिनानिमित्त खुप ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम किंवा पार्टी केले जातात. यामुळे या नात्यात जवळीक अजून निर्माण होत जाते. नवीन पध्दतीने शुभेच्छा देत मैत्री दिवस साजरा देखिल केला जातो.

मैत्री दिनाच्या खूप शुभेच्छा

युक्ती तांबे, ७वी
साधना विद्यालय, सायन
सलाम बॉम्बे फाउंडेशन, मिडीया अकादमी

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत