मेरा भी तो अधिकार है…

मेरा भी तो अधिकार है…

I also have the right...

नवी मुंबई- कोरोच्या लिंग भाव समानता आणि मुलांचे हक्क प्रोग्राम टीम संपूर्ण महाराष्ट्रात जागतिक बालमजुरी विरोधी सप्ताह राबवित आहे. या सप्ताह अंतर्गत दहा गावांमध्ये महिला, लहान मुले आणि ग्रामपंचायत यांनी एकत्र येऊन चित्रकला, हस्तकला, गायन आणि नृत्य या कलेच्या माध्यमातून मुलांना व्यक्त होण्याची संधी मिळाली. त्यांच्या मनात नक्की कोणत्या गोष्टींना घेऊन ताण-तणाव आहे ? यांवर चर्चा करून ग्रामपंचयतीतर्फे काही गोष्टींवर काम करण्यात येणार आहे. त्यातील महत्वाची बाब म्हणजे आपल्या गावात बाल मजुरी आणि बाल विवाह होणार नाही याची खबरदारी घेऊन त्यावर काम केले जात आहे. आणि लॉकडाऊनच्या काळात बाल विवाह आणि बाल मजुरीचे प्रमाण जिथे वाढत होते, तिथे कोरोच्या साथीने बाल हक्क कायद्यांर्गत बीड, नंदुरबार आणि सातारा येथे काम करण्यात आले.

संपूर्ण गाव एकत्र येऊन मुलांच्या हक्कांसाठी उभे राहिले आणि या बदलाची नवी कळी उमलण्यास मदत झाली. बऱ्याच गावांमध्ये लहान मुलांनी बाल विवाह आणि बाल मजुरी रोखण्यास मदत केली. या सप्ताह निमित्त महाराष्ट्रातील गावांमध्ये ग्रामपंचायत लहान मुलांचे प्रश्न ऐकून त्यांच्यावर समजूतदारीने काम करीत आहे. आपल्याकडे लहान मुलांचे संगोपन हा मुद्दा नेहमी एकतर्फी दृष्टिकोनातून पाहिलं जातो, मोठे सांगणार आणि लहान ऐकणार आणि तसेच वागणार त्यामुळे संवाद अभावी येणारी दरी ही बऱ्याच गुन्ह्यांना आमंत्रण देते. पण आपल्या लिंग भाव समानता आणि मुलांचे हक्क प्रोग्राम आणि मीना राजू मंचच्या माध्यमातून आपण हा संवाद दोन्ही बाजूंनी प्रभावी आणि संतुलित कसा असेल यांवर काम करतोय आणि त्याच फलित म्हणजे लोक डाऊन च्या काळात सगळी काळजी घेऊन गाव मुलांच्या प्रश्नांसाठी एकत्र आला आहे. सध्या दहा गावात हा सप्ताह राबवित असून 50 गावांपर्यंत पोहचायचा कोरो संस्थेचा मानस आहे.

या सप्ताहानिमित्त थादाळे गावाच्या बस स्टँड जवळ मुलींसाठी शौचालय या वेळी मंजूर झाले आहे, कॉविड मुळे शाळा ऑनलाइन चालू आहेत त्यामुळे ज्या मुलांच्या पालकांकडे मोबाईल रिचार्ज साठी पैसे नाहीत त्यांना ग्रामपंचायतीने वाय- फाय द्यावा, गावात बाल विवाह होत नाही आणि या पुढे ही होणार नाही या करीता काम करावे यांसारखे अनेक मुद्दे मांडण्यात आले. याबाबत श्रीपालवनमध्ये मुलांच्या सोबत बैठक झाली आणि गावात बाल विवाह आणि बाल मजुरी होऊ नये याकरिता गावात पोलीस पाटील यांची मदत घेऊन पोस्टर जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले.

“खरंच कोरो मुळेच आम्हाला मुलांचे अधिकार कळतात आणि तसा विचार करायला भाग पाडतात. मुल गावाचं भविष्य आहेत आणि त्यांची जबाबदारी ही आमचीच आहे हे आम्हाला समजले आहे. गेल्या दोन वर्षात मुलांचं भविष्य खडतर दिसत आहे आणि त्यावर मार्ग कसा काढायचा हे कोरो कडून शिकलो आणि त्यातूनच ही मोहीम राबविण्याचे डोक्यात आले. मुल ही आता एवढे जागरूक झालेत की त्यांना माहिती आहे की त्यांच्या अधिकारासाठी त्यांना आलेल्या अडचणींसाठी आम्ही आहोत न घाबरता आमच्यासोबत येऊन ते त्यांच्या प्रश्नांवर काम करतात.” – संगीता शिंदे, श्रीपालवण (सरपंच)

मुलांचे म्हणणे-

“लोकडाऊन मुळे खरचं खूप कंटाळा येतो, मनावर एक दडपण येत, मोकळ्या मैदानात खेळता येत नाही, शाळेत जाता येत नाही. त्यामुळे सगळ एकसुरी होऊन बसलं होत पण या सप्ताह च्या माध्यमातून मला रंगांसोबत खेळता आल. चित्र काढून मला जे वाटतं ते सांगता आल. मन मोकळं करता आलय” – ज्ञानेश्वरी, श्रीपालवण

“ताई दादा घरी आले होते आणि आई सोबत गप्पा मारत होते आणि विषय होता मुलांनाच्या स्पर्धा. मग काय अजून हुरूप आला आणि मी खेळायला जायचे थांबले आणि आपल्यासाठी काहीतरी वेगळं आणि नवीन असणार आणि त्यातून मज्जा येणार अस वाटल” – कार्तिकी, श्रीपालवण

“आमचं सध्या खेळणं, बाहेर फिरायचे बंद आहे घरी राहून काम करायच आणि तरीही नाही बर वाटलं तर आई वडिलांसोबत रानात जायचं, शेळ्या राखायला जायच्या पण आम्हाला आमच्यासाठी काहीच नव्हत. मुलांना एकत्र पण यायची बंदी आणि त्यात आमच्यासाठी हे सांस्कृतिक उपक्रम आणि हे सर्व करताना मला जे करायचंय ते करण्याची सूट दिली होती त्यामुळे मजा आली” – अनुजा, वारुगड

“मागच्या दोन वर्षात लॉक डाऊन मध्ये आमच्याकडे कोणाचं लक्षच नव्हत पण आता पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका अगदी सर पण आम्हाला सांगत होते, विचारात होते. त्यामुळे आपल्याकडे पण लक्ष आहे आणि आम्हाला किंमत आहे अस वाटल. गावासाठी आम्ही महत्वाचे आहे हे वाटलं” -ओंकार, श्रीपालवण

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत