मेन्स फॅशन,हेअरस्टाईल्स,दाढी,लेटेस्ट ट्रेंड्स

मेन्स फॅशन,हेअरस्टाईल्स,दाढी,लेटेस्ट ट्रेंड्स

मायबोलीवर स्त्रीया बरेचदा फॅशन ,कपडे,हेअरस्टाईल यावर धागे काढुन चर्चा करताना दिसतात.आवडते कपडे कुठे मिळतात,ऑनलाईन कोणत्या वेबसाईट चांगल्या आहेत यावर चर्चा होताना दिसते.बर्याच चांगल्या चर्चा असतात या.
पण मायबोलीवर पुरुषांसाठी असा कुठलाही धागा नाही.तसा विभाग नाही.नुकताच मी स्वतः चा मेकोव्हर केला,लांब केस कापून स्लीक्ड बॅक अंडरकट हेअरस्टाईल ठेवली. लेटेस्ट फॅशन ट्रेंड चाळताना मायबोलीवर फार काही मिळालं नाही ,म्हणून हा प्रपंच.
इथे हेअरस्टाईल ,मेन्सवेअर,फूटवेअर ,लेटेस्ट मेन्स फॅशन ट्रेंडस यावर चर्चा अपेक्षीत आहे.अगदी केस गळायला लागल्यावर तुम्ही काय केलेत.पुर्ण टक्क्ल असेल तर त्यावर मॅच होणारे कपडे.लांब केस ठेवायचे असल्यास करायच्या स्टाईल्स.
दाढी अनेक पुरुष ठेवत आहेत सध्या,लाटच आली आहे .तर तुम्ही दाढी ठेवता का ,कशी ठेवता,कोणती स्टाईल हे अपेक्षीत आहे.
व्हा सुरु!!!!

काही मुलींना सवय असते, एक ड्रेस घातला की पुन्हा तो कित्येक काळ रिपीट करायचा नाही. मी दाढी केसांबाबत तसेच वागतो. प्रत्येकवेळी मी दाढी केसांबाबत आधीच्यापेक्षा काही वेगळे करतो. अगदी कितीही शोभत असले तरी नेक्स्ट टर्नला रिपीट नाही करत. दाढी मला ठेवायला आवडतेच. माझे याबाबत कन्सेप्ट क्लीअर आहेत. देवाने दाढी पुरुषांनाच दिली आहे तर तो पुरुषांचा दागिना आहे. तिचा वापर आपले सौण्दर्य खुलवण्यासाठी करायलाच हवा.

कपड्यांबाबतही माझे ऑफिसमध्ये हमखास कौतुक होते. मी कुठून कपडे घेतो हे विचारले जाते. माझा एक फंडा आहे, मी रोजचे ऑफिसचे शर्ट विकत घेताना फॉर्मलमध्ये न शोधता सेमीफॉर्मलमध्ये शोधतो. त्यातून जे स्टायलिश प्लस डिसेंट वाटेल ते सिलेक्ट करतो. त्यामुळे सोमवार ते गुरूवार मी ईतरांपेक्षा स्टायलिश दिसत असतो. फ्रायडेला जेव्हा बहुतांश जण जीन्स-टीशर्ट या पारंपारीक अवतारात असतात तेव्हा मी सिक्स पॉकेट आणि वर फॉर्मल शर्ट घालतो. बरेचदा अर्धबाह्यांचे. त्यावर बेल्ट लेदर लावतो. कपड्यांबाबत केस दाढीईतके प्रयोग तुलनेत कमी करतो. आपली एक स्टाईल स्टेटमेंट बनणे चांगले असते.

जेव्हा माझी दाढी वाढलेली असेल तेव्हा लाईट शेड कपडे घालतो. व्हाईट आणि स्काय ब्लू.. जेव्हा सटासट असेल तेव्हा पिण्क आणि येल्लो, किंवा कॉफी कलर वगैरे.. जेव्हा खुरटी वाढू लागते तेव्हा ब्लॅक ब्य्लू ग्रे..

नाईलाज आहे, पण धाग्यात शाहरूखला आणतो. त्या माणसाचा ड्रेसिंग सेन्स कमालीचा आहे. त्याच्या टीशर्टसची चॉईस भारी असते पण ती त्यालाच सूट होते, मला होत नाही म्हणून फॉलो करत नाही. पण फॉर्मल शर्टसबाबत मी नेहमी स्वदेशचा मोहन भार्गव दिसायचा प्रामाणिक प्रयत्न करतो Happy

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत