मृत व्यक्तीच्या आंगला वार आसल्याने घात पाताचा मयत कुटुंबाचा संशय

मृत व्यक्तीच्या आंगला वार आसल्याने घात पाताचा मयत कुटुंबाचा संशय

जातेगाव प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलिस ठाणे अंतर्गत राजापुर गोळेगाव शिवारात एका ३२ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला.मयताच्या तोंडावर माराच्या व गळा आवळल्याच्या खुणा असल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचे आढळुन आले आहे

 गोळेगांव ता.गेवराई येथे भटक्या गोसावी समाजाचे काही कुटुंब पाल ठोकुन वास्तव्य करतात.त्यातीलच ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण वय ३२ वर्षे हा तरुण कुटुंबासह राहतो.त्याचा मृतदेह राजापुर गोळेगाव शिवारातील  एका शेतात आढळुन आला.त्याच्या चेहर्‍यावर जखमा व  गळा आवळल्याची खुण आढळली आहे.त्यामुळे हा खूनाचा प्रकार असल्याची पोलिसांची प्राथमिक माहीती आहे.तो काल सायंकाळी एका अनोळखी ईसमाच्याा दुचाकीवर बसुन गेल्यानंतर परत आलाच नाही त्यानंतर त्याचा मृतदेहच आढळला असुन त्याचा खून झाल्याचा आरोप आई व पत्नीने केला आहे.

माहीती मिळाल्यानंतर तलवाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक प्रताप नवघरे यांनी कर्मचारी कृष्णा वरकड,रामेश्वर खंडागळे,खाडे,राऊत यांच्यासह घटनास्थळी जावुन पाहणी करत पंचनामा केला.व मृतदेह शवच्छिदेन तपासणीसाठी (पोस्ट माॅर्टेम) साठी तलवाडा प्रा.आरोग्य केंद्रात पाठवला आहे.याबाबत रिपोर्ट आल्यानंतर तपासाची दिशा ठरेल अशी माहीती पोलिसांनी दिली आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत