मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनी आज घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस..

दिवसेंदिवस राज्यात कोरोनाबधितांची संख्या वाढताना दिसत आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाचा दुसरा डोस घेतल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वी त्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस ११ मार्च रोजी मुंबईतील जे.जे.रुग्णालयात घेतला होता.

मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोनाचा दुसरा डोस..#uddhavthakrey #corona #coronavaccine #maharashtra #covid19 @CMOMaharashtra #trending pic.twitter.com/oPG3NBvgpy
— The Maharashtra News (@TheMaharashtra3) April 8, 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. तसेच त्यांनी ही बातमी ट्विटरच्या माध्यमातून जनतेला दिली आहे. यापूर्वी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यांनी ही लस घेताना सांगितले, की जे नागरिक पात्र आहेत त्यांनी लवकरात लवकर लसीकरणासाठी नोंदणी करावी असे आवाहन जनतेला केले आहे.

administrator

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत