मुंबईत महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात धक्कादायक प्रकार

मुंबईत महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात धक्कादायक प्रकार

shocking news at mumbai muncipal corporation's rajawadi hospital

रुग्णाचा उंदराने डोळा कुरतडला ! महापौरांनी दिले चौकशीचे आदेश

नवी मुंबई- मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात रुग्णासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्ण आयसीयुमध्ये दाखल होता त्यावेळी डोळ्याच्या खालच्या भागात रुग्णाला उंदीर चावला. ही गंभीर घटना असून चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणकेर यांनी दिली असून महापौरांनी याबाबत तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

राजावाडी रुग्णालयात श्रीनिवास यल्लपा हे २४ वर्षीय रुग्णा दोन दिवसांपूर्वी आयसीयुमध्ये दाखल होते. त्यांना मेंदूज्वर आणि यकृतासंबंधी समस्या हाेती. मंगळवारी सकाळी त्याच्या नातेवाइकांना रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसल्याने त्यांनी डोळे तपासले असता डोळ्याला उंदराने कुरतडल्याचे नातेवाईकांना दिसले. याबाबत नातेवाईकांनी तेथील परिचारिकेला सांगितले असता परिचारिकेने उद्धट उत्तरं दिले.

या प्रकरकणाबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी रुग्णालयाला भेट दिली आणि “घडलेला हा प्रकार गंभीर आहे. रुग्णावर तातडीने उपचार करण्यात आले आहेत. या घटनेच्या चौकशीचे आदेश महापालिका प्रशासनास दिले आहेत”, असे महापौरांनी यावेळी सांगितले.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत