मुंबईतील लसीकरणाला सुरूवात

मुंबईतील लसीकरणाला सुरूवात

मुंबई : मुंबईला तब्बल १ लाख लसींचा पुरवठा झाला असून पुन्हा एकदा ४५ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणास प्रारंभ झाला आहे. सध्या या लसी शासकीय लसीकरण केंद्रांवर उपलब्ध झाल्या आहेत.

मागचे काही दिवस मुंबईला लसींचा पुरवठा सुरळीतपणे होत नसल्याचे म्हटले जात होते. मात्र रात्री उशिरा १ लाख डोसेस मुंबईत पोहोचले असून आजपासून ४५ वर्ष व त्यावरील वयागटाचे नियमित लसीकरण शासकीय व महापालिका लसीकरण केंद्रांवर सुरू झाल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ट्वीटर हँडल वरून देण्यात आली.

भारतातील लसीकरणाच्या मोहिमेने वेग पकडला आहे. यापूर्वी भारतातील लसीकरणाची मदार केवळ कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोनच लसींवर होती. मात्र भारतातील लसीकरणाचा वेग लक्षात घेऊन केंद्र सरकारने नव्या लसींची तरतूद केली आहे.

या नव्या लसींमध्ये परदेशी लसी आहेत. त्यापैकी स्पुतनिक ही लस भरतात दाखल झाली असून, लवकरच तिचेही डोस नागरिकांना दिले जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर चार लसी देखील भारतात दाखल होणार आहेत. मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन, फायझर आणि कोवोवॅक्स या लसींना देखील भारताने मान्यता दिली आहे. त्यामुळे भारतातील लसीकरण अधिक वेग पकडू शकेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत