‘मीही ब्राह्मण’ वक्तव्यावरून रवींद्र जडेजा वादात …

‘मीही ब्राह्मण’ वक्तव्यावरून रवींद्र जडेजा वादात …

Ravindra Jadeja in controversy over 'Mihi Brahmin' statement ...

भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाच्या ‘मीही ब्राह्मण’ वक्तव्यावरून निर्माण झालेला वाद अद्या थांबलाही नाही. तोच, आता टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजाही अपल्या एका ट्विटमुळे लोकांच्या निशाण्यावर आला आहे. सध्या जडेजा इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्याने तेथूनच एक ट्विट केले आहे.ट्विटमध्ये जडेजाने लिहिले आहे, राजपूत बॉय फोरएव्हर.

अर्थात नेहमीसाठी राजपूत. जय हिंद! जडेजाचे हे ट्विट लोकांना पसंत आले नाही आणि तो ट्विटर यूझर्सच्या निशाण्यावर आला. लोक त्याला जातीवादाला प्रोत्साहन देऊ नकोस, असा सल्ला देत आहेत. जडेजाच्या ट्विटवर एका युझरने लिहिले आहे, की सर आपण लाखो लोकांसाठी प्रेरणा आहात. आम्हाला आपल्याकडून अशी आशा नव्हती. आपला रंग, रूप आणि धर्म याला महत्व नाही. आम्ही आपल्यावर नेहमीच प्रेम करत आलो आहोत.

318574.4

आणखी एका युझरने लिहिले आहे, जातीवादामुळे देश बर्वाद आहे. जड्डूकडून अशा पोस्टची अपेक्षा नव्हती. एका उंचीवर पोहोचला असतानाही तो जातीवादाला प्रोत्साहन देत आहे. लज्जास्पद! आणखी एका युझरने म्हटले आहे, व्यक्ती जन्माने महान ठरत नाही. आपण जे काही आहात, त्याचा अभिमान बाळगा, आपल्यावर थोपवण्यात आलेल्या लेबलवर नव्हे.

यावर बोलताना रैना म्हणाला की,”मला वाटते, मीही ब्राह्मण आहे. २००४पासून मी चेन्नईत खेळतोय. मला येथील संस्कृती आवडते. मला माझे सहकारीही आवडतात. अनिरुद्ध श्रीकांत, सुब्रमणीयम बद्रीनाथ, लक्ष्मीपथी बालाजी यांच्यासोबत मी खेळलोय. चेन्नईकडून तुम्हाला काही चांगलं शिकायला हवं. चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य होण्यास मिळाल्याने, मी स्वतःला नशीबवान समजतो. आशा करतो आणखी काही सामने येथे खेळायला मिळतील.”

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत