मिस मॅक्सिको २०२१ च्या स्पर्धकांना कोरोनाची लागण

मिस मॅक्सिको २०२१ च्या स्पर्धकांना कोरोनाची लागण

Miss Maximo 2021 contestants infected with corona

Miss Mexico 2021 : गेल्या आठवड्यात पार पडलेल्या Miss Mexico 2021 स्पर्धेतील जवळपास अर्ध्या स्पर्धकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या स्पर्धकांमध्ये सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणं असतानाही त्याची वाच्यता कुठेही करु नये असा त्यांच्यावर दबाव आणला आणि स्पर्धा कायम सुरु ठेवण्याचा निर्णय आयोजकांकडून घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या स्पर्धेत भाग घेतलेल्या 32 पैकी 15 स्पर्धकांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. तसेच टीमच्या काही सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.’द गार्डियन’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांमध्ये ताप, कफ, खोकला आणि इतर कोरोनाची लक्षणं दिसत होती. त्याही परिस्थितीत या स्पर्धकांनी कोणतीही तक्रार करु नये असा दबाव त्यांच्यावर आणण्यात आला. मेक्सिको देशातील चिहूयाहुवा या शहरात गेल्या आठवड्यात ही स्पर्धा पार पडली.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत