“मासिक आकडेवारी देऊन दुसऱ्या लाटेत काय लपवण्याचे गौडबंगाल आहे?” भाजपाचा हल्लाबोल

“मासिक आकडेवारी देऊन दुसऱ्या लाटेत काय लपवण्याचे गौडबंगाल आहे?” भाजपाचा हल्लाबोल

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (BJP Pravin Darekar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी कोरोनाचा कहर कायम असल्याचे दिसून येत आहे. मात्र, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा लपवला जात असून, कोरोनाच्या संदर्भात आभासी चित्र रंगवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आता विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर(BJP Pravin Darekar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे. कोरोना संदर्भातील आकडेवारीवरून जोरदार हल्लाबोल केला आहे.

प्रविण दरेकर यांनी उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार मुंबई महानगरपालिका गेल्या कित्येक वर्षांपासून करते आहे, त्याचाच परिचय पुन्हा एकदा शिवसेनेने दिला आहे असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. तसेच कोरोना काळात केंद्राने महाराष्ट्राला पाठवलेली Ventilators, Oxygen, Remdesivir, Vaccine इ. आरोग्य सामुग्री कुठे गेली?असा सवाल देखील विचारला आहे. मासिक आकडेवारी देऊन दुसऱ्या लाटेत काय लपवण्याचे गौडबंगाल आहे? असं म्हणत दरेकरांनी टीकास्त्र सोडलं आहे. प्रविण दरेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत.

आकडे लपवले जात असल्याचा गंभीर आरोप

“RTPCR चाचण्या कमी करून संसर्ग दर कमी दाखविले जात असल्यासंदर्भात तसेच #Covid19 मुळे झालेले मृत्यू अन्य कारणांमुळे झाले असल्याची नोंद होत आहे, देवेंद्रजी फडणवीस यांनी ही अनियमितता आपल्या पत्रात तारखा, उदाहरणांसह उघड केली. त्याला मोघम उत्तर देत मुंबई महानगरपालिकेने आणखी संशय वाढवला” असं म्हटलं आहे. तसेच “RTPCR चाचण्या केल्यानंतर संसर्ग दर २३.४३% पर्यंत कसा गेला,हे मान्य करता मग मासिक संसर्ग दर मार्चमध्ये वाढून ११.२३% व एप्रिलमध्ये १८.०६% पर्यंत गेला, ही माहिती का लपवून ठेवता? मासिक आकडेवारी देऊन दुसऱ्या लाटेत काय लपवण्याचे गौडबंगाल आहे?” असा संतप्त सवाल देखील भाजपाने केला आहे.

“केंद्राने महाराष्ट्राला पाठवलेली Ventilators, Oxygen, Remdesivir, Vaccine इ. आरोग्य सामुग्री कुठे गेली?

ventilators, oxygen, Remdesivir, vaccine इ. आरोग्य सामुग्री कुठे गेली? याचा लेखाजोखा प्रथम जयंत पाटलांनी जनतेला द्यावा. सांगली, सातारा, पुण्याला किंवा प्रभावशाली मंत्र्यांकडे या वस्तू किती झिरपल्या, ते आधी सांगावे” असं देखील प्रविण दरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.विरोधी पक्ष नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले, त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणे अपेक्षित होते. मात्र उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार मुंबई महानगरपालिका गेल्या कित्येक वर्षांपासून करते आहे, त्याचाच परिचय पुन्हा एकदा शिवसेनेने दिला आहे. कोरोना काळात केंद्राने महाराष्ट्राला पाठवलेली ventilators, oxygen, Remdesivir, vaccine इ. आरोग्य सामुग्री कुठे गेली? याचा लेखाजोखा प्रथम जयंत पाटलांनी जनतेला द्यावा. सांगली, सातारा, पुण्याला किंवा प्रभावशाली मंत्र्यांकडे या वस्तू किती झिरपल्या, ते आधी सांगावे” असं देखील प्रविण दरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत