माणुसकी जपणाऱ्या हिऱ्यांना सलाम

माणुसकी जपणाऱ्या हिऱ्यांना सलाम

जातेगाव येथे सह महीण्याची गर्भवती महीला रडु लागल्याने डाॅ जिवनकुमार राठोड यानी धिर देत आधार दिला

गेवराई प्रतिनिधी

ती सहा महिन्यांची गर्भवती, रिपोर्ट ॲटीजन टेस्ट चा पॉजीटिव्ह महिला लागली हंबरडा फोडायला,साहजिक आहे तिचं रडणं,ती आई आहे तिला तिच्या पिल्लाची काळजी नक्कीच वाटणार.
पण असल्या परिस्थिती मध्ये गरज आहे तिला सहारा देण्याची,तिचा पाठीराखा होण्याची,तिला आभाळासारखं कवेत घेऊन धीर देण्याची,तिच्या सोबत माणुसकी दाखवण्याची…
ती माणुसकी दाखवली जातेगाव ता गेवराई येथील डॉ.जीवन राठोड यांनी त्या ताई ला मिठीत घेऊन तिला धीर दिला,तिला समजावलं,अन पुढील उपचारासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठवलं…
आजच्या परिस्थितीत आपले परके झालेत,तिथंच फक्त पेशंट म्हणूनच नाही तर माणुसकी म्हणून तिला धीर देताना तिला जवळ घेणं या साठी सुदधा काळीज लागतं, ते पण माणुसकी आसणारं..

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत