माझे बाबा…

माझे बाबा…

my father

आई वर मी खुप काही लिहून शकतो, बोलु शकतो पण बाबांवर काही लिहिन खरंच अवघड जातंय, या आधी कधीच बाबांवर लिहिलं नाही आहे. बाबांनी माझ्यासाठी काही केल नाही किंवा त्यांनी मला प्रेम दिलं नाही असं नाही. बाबा म्हटले की रागीट, तापट स्वभावाचे असं डोळ्यासमोर येत, ते उगाच नव्हे.

तर माझे बाबा थोडे रागीट आहेत मी घाबरतो त्यांना पण ते प्रेम पण तेवढंच करतात शेवटी त्यांना माझी काळजी वाटते. लॉकडाऊन मध्ये आमच्या घरचे खुप हाल झाले. बाबा घरीच होते काम नसल्यामुळे खूप प्रोब्लेम झाले होते तरी काय बाबा शांत बसले नाही त्यानी आमच्या जेवणाची सोय केली.

मी आजारी पडलो तर बाबा रात्र भर माझी काळजी घेतात. त्यांना काळजी वाटते माझी. मी काही नवं वेगळं शिकावं व नवीन काही तरी वेगळं करावं यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. ते स्वतः आपल्या जीवाच रानं करतात आमच्यासाठी. भविष्यात काही वेगळं करावं यासाठी ते सतत प्रयत्न करतं राहतात. मी माझ्या बाबांचे हे कष्ट वाया जाऊ देणार नाही. खुप प्रेम बाबा.

राजीव अभंग,९वी
साधना मराठी विद्यालय, सायन
सलाम बॉम्बे फाउंडेशन, मिडीया अकादमी

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत