माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीची झडती

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीची झडती

former home minister anil deshmukh's residence raided by ED

नवी मुंबई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या ईडीच्या कचाट्यात अडकले असून त्यांचा नागपूरमधील घरावर ईडीने छापा टाकला आहे. अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी ईडीकडून झडती घेण्यात आली. या तपासासाठी ६- ७ अधिकारी नागपुरातील देशमुखांच्या घरी पोहोचले आहेत.

अनिल देशमुख यांच्या घराबाहेर बंदोबस्तासाठी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. सकाळी ८ वाजताच ईडीचे अधिकारी अनिल देशमुख यांच्या घरी दाखल झाले होते. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ईडीकडून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू झाली असून या संदर्भातच हा छापा टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Anil Deshmukh Nagpur Raid

तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर ते गृहमंत्री असताना त्यांनी १०० कोटी रूपयांच्या खंडणी
प्रकरणी गंभीर आरोप केले होते. याच संदर्भात पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे सुप्रीम कोर्टात गेले. तेव्हा त्यांना सर्वोच्च न्यायालयाने आधी हाय कोर्टात याचिका दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर परमबीर सिंह यांनी हाय कोर्टात याचिका दाखल केली.

तसेच अनिल देशमुख गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर हाय कोर्टाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नागपूरमधील घरावर छापा टाकला असता फक्त त्यांचे कुटुंबीय घरात होते आणि अनिल देशमुख दौऱ्यावर गेले असल्याचे सांगण्यात येत आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत