माजी अटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनामुळे निधन

माजी अटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनामुळे निधन

प्रख्यात वकील, देशाचे माजी अटॉर्नी जनरल पद्मविभूषण सोली सोराबजी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते ९१ वर्षाचे होते. सोली सोराबजी यांची ओळख एक तत्वनिष्ठ आणि मधुर व्यक्तीमत्व अशी होती. त्यांच्या निधनावर देशातील अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केलं आहे.सोली सोराबजी यांचं पूर्ण नाव सोली जहांगीर सोराबजी असं आहे. त्यांचा जन्म १९३० साली मुंबईमध्ये झाला. १९५३ साली त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिसला सुरुवात केली. सोली सोराबजी १९७१ साली सर्वोच्च न्यायालयात सीनियर काऊन्सिलर झाले. सोली सोराबजी हे १९८९ ते १९९० या काळात देशाचे अटॉर्नी जनरल होते. त्यानंतर पुन्हा एकदा १९९८ ते २००४ या काळात त्यांनी ही जबाबदारी पार पाडली.

सोली सोराबजी यांची ओळख देशातील एक प्रख्यात वकील अशी होती. त्यांची गणना जगातील मोठ्या मानवाधिकार वकिलांच्या यादीतही होत होती. नायजेरिया देशातील मानवाधिकाराच्या उल्लंघनाबद्दल माहिती घेण्यासाठी त्यांना संयुक्त राष्ट्राने १९९७ साली विशेष दूत म्हणून पाठवलं होतं. सोली सोराबजी यांच्या योगदानाची दखल घेऊन भारत सरकारच्या वतीनं त्यांचा पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत