महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन विशेष

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन विशेष

सर्वप्रथम सर्वांना 1 मे महाराष्ट्र दिन आणि त्याच बरोबर जागतिक कामगार दिनाचा हार्दिक शुभेच्छा…
हा दिवस जगातील 80 देशात कामगार दिन म्हणून साजरा केला जातो पण आपल्या या सुंदर भारत देशात तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यात खरोखर कामगारांना त्यांचा अधिकार मिळतोय का ?? ज्याप्रकारे आत्ताची बिकट परिस्थिती आहे त्याप्रकारे सर्वसामान्य कामगार वर्गाला दोन वेळच्या जेवणासाठी सुद्धा अत्यंत वाईट परिस्थिती ला सामोरे जावे लागत आहे … पण कदाचित आपण या गोष्टी सुधारून एक नवा महाराष्ट्र आणि एक नवा भारत देश घडवू शकतो … जितके पैसे निवडणुकीच्या काळात खर्च केले जात आहेत त्यातले निम्मे पैसे जरी राज्याचा आणि देशाच्या आरोग्य व्यवस्थेत खर्च झाले तर कित्तेक लोकांचे जीवन वाचू शकेल .. त्याच बरोबर हा जो कोरोना च्या नावाखाली जो लोकांच्या आयुष्यासोबत खेळ चालू आहे तो वेळेतच थांबण्याची गरज आहे…. औषधांचा जो काळाबाजार चालू आहे त्याला आताच सरकार ने आळा घालावा अशी माझी या लेखाच्या माध्यमातून विनम्र विनंती आहे… देशातील सर्वात जास्त लोकसंख्या ही युथ म्हणजेच तरुणांची आहे तर राज्यसरकार ने तरुण वर्गाकडे विशेष लक्ष द्यायला हवे …. सध्या भटकत चाललेल्या तरुण पिढीला आशेचा एक मार्ग उपलब्ध करून देण्याचे काम सरकार चे आहे …. आणि फक्त निवडणुकीच्या वेळी आश्वासने म्हणून नाही तर खरच या सर्व गोष्टीकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज सध्या या देशाला आणि आपल्या राज्याला आहे …

e67871cc738d7145304e774c0d1a29be

महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे१९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.

१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. युरोपात १ मे रोजी मेपोल हा काठी महोत्सवसुद्धा साजरा होत असतो.

२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.

OIP 3

त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले.

या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.

कामगार दिन

आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन (अन्य नावे : मे दिन) हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो; तसेच अन्य कित्येक देशांमध्येही अनधिकृतरित्या हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस प्राचीन युरोपातील वसंत दिनाच्या दिवशीच असतो.

हा दिवस शिकागो मध्ये ४ मे १८८६ मध्ये घडलेल्या हेमार्केट घटनेच्या स्मरणार्थ जगभरातील समाजवादी, साम्यवादी आणि अराजकतावादी पक्ष साजरा करतात.

ee5c7df1 0ba6 48e5 a2f6 248b3b2be2af

सध्याचा ‘मे दिन’ हा १९ व्या शतकाच्या मध्यावर कामगार चळवळीतून सुरु झाला. ज्याची मुख्य मागणी ‘आठ तासाच्या कामाच्या दिवसाची’ होती.  या संदर्भातील पहिली मागणी २१ एप्रिल १८५६ रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांकडून आली तेव्हापासून हा दिवस तेथे सुट्टी म्हणून जाहीर झाला. ऑस्ट्रेलियातील कामगारांच्या मार्गाने जात अमेरिका आणि कॅनडातील अराजाकातावादी संघटनांनी १ मे १८८६ रोजी मोर्चे आणि धरणे यांची मालिका सुरु केली. अशाच एका मोर्चाला पांगवताना ४ मे १८८६ रोजी शिकागो मध्ये सहा आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. याची परिणती पोलिसांच्या क्रूरतेविरोधातील एका मोठ्या निषेधात झाली त्यात एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांवर बॉंब टाकला ज्यात ८ पोलिसांचा मृत्यू आणि ५० पोलीस जखमी झाले.

या घटनेच्या स्मरणार्थ १ मे १८९० रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी रेमंड लेविन याने ‘दुसऱ्या आंतरराष्ट्रीय’च्या १९८९ च्या पॅॅरीस परिषदेत केली. त्या परिषदेत १ मे १८९० हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले. १८९१ च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिक रित्या प्रतीवार्षिक कार्यक्रम म्हणून मान्यता देण्यात आली.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत