महाराष्ट्रात आजपासून “शटर लॉक”

महाराष्ट्रात आजपासून “शटर लॉक”

"Shutter lock" in Maharashtra from today

कोरोनोच्या वाढत चाललेल्या प्रभावामुळे महाराष्ट्र सरकारने पुन्हा महाराष्ट्र बंदची घोषणा केली असून कोरोनाव्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे डेल्टा प्लस व्हेरियंटचा प्रभाव वाढल्याने राज्यात सर्व जिल्ह्यांचा लेव्हल ३ मध्ये समावेश करण्यात आला आहे यामुळे आज सोमवारी दुपारपासून चार नंतर महाराष्ट्रात अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे संचारबंदी करण्यात आली आहे
महाराष्ट्र राज्यात कोरोनाची संख्या कमी झाल्यामुळे सरकारने पाच लेव्हलमध्ये निर्बंध शिथिल केले होते. परंतु निर्बंध शिथिल केल्यामुळे पुन्हा काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली त्यामुळे हे बाब लक्षात घेता सरकारने पुन्हा नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहे
नवीन निर्बंधाप्रमाणे आता सर्व जिल्हे, महानगरपालिका यांचा समावेश तिसऱ्या गटात करण्यात आला आहे मुंबईप्रमाणे पुण्यात हि नियमावलीमध्ये बदल करण्यात आला आहे पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.पुण्यात सध्या दुकाने सात वाजेपर्यंत आणि रेस्टॉरंट, बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात होती.


राज्यसरकारद्वारे लावण्यात आलेले निर्बंध

 • या नव्या निर्बंधांनुसार अत्यावश्यक वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत खुली राहतील.
 • हॉटेल आणि रेस्टॉरंटही दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. त्यानंतर पार्सल किंवा टेक अवे पद्धतीने सुरु ठेवता येतील.
 • मॉल आणि मल्टिप्लेक्स यांना मात्र कोणत्याही प्रकारे सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आलेली नाही.
 • कल्याण डोंबिवलीत सर्व व्यवहार सायंकाळी वाजेपर्यंतच सुरु राहतील तर दुकाने संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच सुरु ठेवता येतील. त्यामुळे संध्याकाळी 5 नंतर बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.
 • सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सकाळी फिरता येईल. याच वेळेत मैदाने खुली राहतील, सायकलिंग करता येईल.
 • खाजगी कार्यालयंही 50 टक्के क्षमतेसह 4 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. सरकारी कार्यालयंही 50 टक्के क्षमतेसह 4 वाजेपर्यंत खुली राहतील.
 • लग्न समारंभ आयोजित करताना हॉलच्या क्षमतेनुसार 50 टक्के क्षमता वापरता येईल.

author

  Related Articles

  प्रतिक्रिया व्यक्त करा

  आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत