महाराष्ट्रातील लॉकडाऊन चार टप्प्यांमध्ये हटवला जाण्याची शक्यता; राजेश टोपे यांचे संकेत

महाराष्ट्रातील लॉकडाऊन चार टप्प्यांमध्ये हटवला जाण्याची शक्यता; राजेश टोपे यांचे संकेत

राजेश टोपे यांनी लॉकडाऊनबाबत बोलताना म्हटले की, राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. सर्व काही गोष्टी ठिक आणि नियंत्रणात असतील तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याच्या टास्क फोर्ससोबत चर्चा करतील. परंतू, सर्वच निर्बंध हटवले जातील अशा भ्रमात कोणीही राहू नये.

पहिल्या लाटेच्या तुलनेत महाराष्ट्राला कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीच्या दुसऱ्या लाटेत अधिक फटका बसला. संक्रमित रुग्णांची संख्या हाताबाहेर जाऊ लागल्याने महाराष्ट्र सरकारने वेळीच पावले टाकली आणि राज्यात लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) लागू केला. आता येत्या 31 मेला लॉकडाऊनची मुदत संपत आहे. त्यामुळे आता राज्यातील लॉकडाऊन (Lockdown) हटणार की पुन्हा वाढवला जाणार याबाबत उत्सुकता आहे. राज्याचे आरोगयमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत काही संकेत दिले आहेत.

तसेच, इंडिया टुडेनेही याबाबत वृत्त दिले आहे. टोपे यांचे संकेत आणि प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार राज्यातील लॉकडाऊन चार टप्प्यात हटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही गेल्या आठवड्यात लॉकडाऊनबाबत भाष्य केले होते. यावेळीही उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, लॉकडाऊन हटविणे हे नागरिकांच्याहातात आहे. जर सर्व निर्बंध आणि नियम योग्य पद्धतीने पाळल्यास लॉकडाऊन शिथील केला जाऊ शकतो.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत