महान धावपटू मिल्खा सिंह यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन

महान धावपटू मिल्खा सिंह यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन

Great runner Milkha Singh dies at age of 91

नवी मुंबई- भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले.मिल्खा सिंह फ्लाईंग सिख (Flying Sikh) नावाने प्रसिद्ध होते. मिल्खा सिंह यांना 19 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्रअचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना चंदीगढच्या PGI रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे काल म्हणजेच 18 जून रोजी रात्री 11.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

गेल्याच आठवड्यात त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. मात्र स्वतः आयसीयूमध्ये असल्याने त्यांना पत्नीच्या अंत्यसंस्काराला जाता आले नाही आणि अवघ्या काही दिवसातच मिल्खा सिंग यांचे देखील निधन झाल्याने मिल्खा सिंह यांचा मुलगा प्रसिद्ध गोल्फपटू जीव मिल्खा सिंह आणि संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. फ्लाईंग सिख मिल्खा सिंह 1960 साली रोम ऑलिम्पिकमध्ये झालेल्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर होते. त्यांनी थलेटिक्समध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. त्याचप्रमाणे त्यांना १९५९ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते. मिल्खा सिंग यांनी आतापर्यंत बरीच सुवर्णपदके आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पटकावली होती आणि क्रीडा विश्वात भारताची दखल घेण्यासाठी जगाला भाग पाडले होते.

mqdefault

अनेक दिग्ग्ज मंडळींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारताने एक महान खेळाडू गमावला असल्याचे भारताचे पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे सांगितले.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत