महात्मा गांधीच स्पृश्याने अस्पृश्यतेचा कलंक पुसून काढण्याचं स्वप्न साकार करावे !

महात्मा गांधीच स्पृश्याने अस्पृश्यतेचा कलंक पुसून काढण्याचं स्वप्न साकार करावे !
WhatsApp Image 2021 10 03 at 10.23.40 AM


खारघर, नवी मुंबई (२ ऑक्टो,२०२१ )


सत्याग्रह महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री ची जयंती सुप्परक भवन खारघर नवी मुंबई येथे डॉ जी के डोंगरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . प्रारंभी राष्ट्रपित्यांना पुष्पअर्पण आणि दीपप्रजोलन करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्या नेहा राणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शात्री यांच्या जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकला . महात्मा गांधी यांची हिंदुत्वा बाबतचे विवेचन केले. महात्मा गांधी यांच्या विचाराची आज सुद्धा गरज असल्याचे राणे म्हणाल्या. या प्रसंगी जेष्ठ विचारवंत डॉ जी के डोंगरगावकर बोलताना म्हणाले महात्मा गांधी च्या प्रतिमेचा वापर सर्व राजकीय पक्ष करत आहेत ही चांगली बाब आहे. महात्मा गांधीच्या विचारच कार्य प्रत्यक्ष व्यवहारात महात्मा गांधी ला विसरले आहेत. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात अस्पृश्यता आजही कायं आहे. भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने २०१९-२० मध्ये प्रकाशित केलेल्या अवहालानुसार अनुसूचित जाती जमातींना त्यांच्या जाती कारणावरून मंदिर प्रवेशास त्यांना नाकारले जाते. पंढरपूर आणि मद्रास वरील हिंदूंच्या मंदिरात अनुसूचित जाती जमातीच्या पुजाऱ्यांची नेमणूक करण्यास ब्राह्मणत्तेर हिंदू सुद्धा विरोध करतांना दिसून येते . ओबीसी हिंदूच आहेत त्यांच्या जनगणना करण्यास मुस्लिंम ख्रिश्चनांचा विरोध नाही . हे सर्व राष्ट्रपिता महात्मा गांधीला मान्य होत का ? असा सवाल उपस्थित करून डोंगरगावकर म्हणाले अस्पृश्यतेचा कलंक शतप्रतिशत पुसला गेला नाही. महात्मा गांधीच अन्य विचाराबरोबरच अस्पृश्यतेचा कलंक पुसण्याची नव्हे समूळ नष्ट करण्याचा अजेंडा सर्व राष्ट्रीय पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात अंतर्भूत करण्यासाठी निवडणूक आयोगाने सक्ती करावी . अनुसूचित जाती जमातीची लोक प्रतिनिधी विधिमंडळ आणि संसदेत अस्पृश्यतेच्या प्रकरणी मोन धारण करणे पसंत करतात त्यामुळे संविधानाच्या कलम १७ नुसार संविधानाने दिलेल्या कर्तव्य नाकारत आहेत, असे ते म्हणाले. सुजाता भोसले , एम एल सूर्यवंशी आणि शिक्षक शिक्षकेयात्तर उपस्थित होते.

प्रा. वनिता सुरवंशी

WhatsApp Image 2021 10 03 at 10.23.33 AM
author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत