मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन;

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन;

महाराष्ट्र – मराठी चित्रपट सृष्टीतील चाकोरीबाहेरील या चित्रपटांद्वारे चित्रपटसृष्टीवर आपला अनोखा ठसा उमटविणाऱ्या दिग्दर्शिक आणि समाज अभ्यासक सुमित्रा भावे यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या. २०१६ मध्ये त्यांच्या ‘कासव’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

sumitra bhave1

गेल्या काही दिवसांपासून सुमित्रा भावे ह्या आजारी होत्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. भावे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्या सोबतीने अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपटांची निर्मिती केली. ‘बाई’ आणि ‘पाणी’ या सुरुवातीच्या लघुपटांना लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी १९९५ मध्ये ‘दोघी’ हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट निर्माण केला. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, ‘घो मला असला हवा’, ‘कासव’, ‘अस्तू’ हे चित्रपट खूप गाजले. त्यांचे चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत नावाजले गेले, तर अनेक चित्रपटांना राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. ‘दिठी’ हा त्यांनी स्वतंत्ररीत्या दिग्दर्शित केलेला चित्रपट दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. सोनाली कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, सचिन कुंडलकर यांच्यासह अनेक कलाकारांना सुमित्रा भावे यांच्याकडे चित्रपटाचे धडे शिकता आले.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत