मराठा आरक्षण मुद्द्यासह ‘मूक मोर्चा’ आंदोलनात असतील ‘या’ प्रमुख मागण्या

मराठा आरक्षण मुद्द्यासह ‘मूक मोर्चा’ आंदोलनात असतील ‘या’ प्रमुख मागण्या

मराठा आरक्षण (Maratha Reservationa) मुद्द्यावर कोल्हापूर येथे आज मूक मोर्चा (Silent Protest) काढण्यात येत आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या या मोर्चात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. जवळपास या मागण्या जुण्याच आहेत. त्या पूर्ण न झाल्यानेच पुन्हा एकदा नव्याने मोर्चा काढण्यात येतो आहे.

मराठा आरक्षण (Maratha Reservationa) मुद्द्यावर कोल्हापूर येथे आज मूक मोर्चा (Silent Protest) काढण्यात येत आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या या मोर्चात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. जवळपास या मागण्या जुण्याच आहेत. त्या पूर्ण न झाल्यानेच पुन्हा एकदा नव्याने मोर्चा काढण्यात येतो आहे. प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेलेल मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि त्यावरुन निर्माण झालेली स्थिती. या पार्श्वभूमीवर हा मोर्चा महत्त्वाचा मानला जात आहे. मराठा आरक्षण या प्रमुख मुद्द्यासह या मोर्चात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. शिवाय राज्यातील कोरोना व्हायरस महामारीच स्थिती पाहून मोर्चेकऱ्यांसाठी काही अचारसंहिताही देण्यात आली आहे. प्रामुख्याने मोर्चेकऱ्यांनी कशा पद्धतीने मोर्चात सहभागी व्हायचे आहे. तसेच, कशा प्रकारचे वर्तन ठेवायचे आहे याबाबत ही अचारसंहीता आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी ही अचारसंहिता आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सविस्तर दिली आहे. आज (16 जून) सकाळी 11 वाजलेपासून या मोर्चाला कोल्हापूर (Silent Maratha Kolhapur) येथून सुरुवात होत आहे.

मूक मोर्चा आंदोलनातील प्रमुख मागण्या

  1. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका( रिव्ह्यू पीटिशन) दाखल करावी. जस्टिस गायकवाड आयोगाच्या शिफारसींचा बचाव करावा, न्यायालयाने रिव्ह्यू पीटिशन अमान्य केल्यास तर दुसरा पर्याय क्युरेटीव्ह पिटीशनचा (Curative Petition)पर्याय उपलब्ध आहे.
  2. केंद्र सरकार ची जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने एक व्यवस्था दिली आहे. त्याकरिता 338b नुसार राज्याने प्रस्ताव तयार करून राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे तो पाठवावा. राष्ट्रपती त्यांच्या अधिकारात त्याला मजुरी देऊ शकतात किंवा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे विचारार्थ पाठवतील. त्यानंतर तो प्रस्ताव संसदेत चर्चेला येईल. मग आपण केंद्र सरकार कडे पाठपुरावा करू शकतो. या संदर्भात लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेणार आहेत?
  3. राज्य शासनाने जो नवीन राज्य मागासवर्ग आयोग स्थापन केला आहे, त्यासंदर्भात मराठा समाजाचे काही प्रश्न आहेत. त्याबाबत सरकार ने तत्काळ भूमिका जाहीर करावी
  4. मराठा आरक्षणासाठी कळीचा मुद्दा बनलेली संविधानात 50% ची जी मर्यादा आहे, त्याबाबत लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका जाहीर करावी.
  1. सारथी’ संस्थेची कार्यालये प्रत्येक महसुली विभागात सुरू करावीत व त्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ‘सारथी’ संस्थेची उपकेंद्रे सुरू करावीत.प्रत्येक जिल्हयात सारथी उपकेंद्र सुरू करून त्याठिकाणी शिक्षण, संशोधन व प्रशिक्षणाचे उपक्रम राबवावेत. मनुष्यबळ व पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ‘सारथी’ संस्थेला कमीतकमी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करावी. सारथी संस्थेचा कणा असणारा तारादूत प्रकल्प तात्काळ सुरू करावा. सर्वात महत्वाचे म्हणजे सारथी ची स्वायत्तता पुन्हा बहाल करावी.
  2. आण्णासाहेब पाटील महामंडळाला कमीत कमी 2 हजार कोटी रूपये निधी उपलब्ध करून देण्यात यावा. लाभार्थी पात्रतेसाठी असलेल्या अटी शिथिल कराव्यात व ही प्रक्रिया अधिक सुलभ करावी, आण्णासाहेब पाटील महामंडळ मार्फत व्याज परताव्याची 10 लाख रूपयांची मर्यादा वाढवून ती किमान 25 लाख रूपये करावी.
  3. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शहरामध्ये शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणींमुळे राहण्याची व जेवणाची सोय होत नाही. यासाठी सध्या शासनाकडून पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता दिला जातो. मुंबई, नागपूर, पुणे अशा महानगरांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 3000 रूपये व इतर ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 2000 रूपये प्रति महिना दिले जातात, ही रक्कम वाढवावी. शासनाकडून मागासवर्गीय वसतीगृहांच्या धर्तीवर मराठा विद्यार्थ्यांसाठी देखील पहिल्या टप्प्यात किमान प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरूपी वसतीगृहांची उभारणी करावी.
  4. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मराठा विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये Super Numerary Seats निर्माण कराव्यात.
  5. कोपार्डी- 2016 साली कोपर्डीच्या भगिनीवर अमानुष अत्याचार झाला. 2017 साली आरोपींवरील गुन्हे सिद्ध होऊन त्यांना फाशीच्या शिक्षेची सुनावणी झाली. तेव्हापासून आजपर्यंत हा विषय प्रलंबित आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने तात्काळ याविषयी उच्च न्यायालयात ‘स्पेशल बेंच’च्या स्थापनेची मागणी करून हा विषय तात्काळ निकाली लावावा.
  6. काकासाहेब शिंदे यांच्यासह सर्वच आत्मबलिदान दिलेल्या मराठा कुटुंबियांना मदत व त्यांच्या कुटंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जावी.
  7. सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानुसार 9 सप्टेंबर 2020 पर्यंत जी नोकर भरती चा विषय होता, तो तत्काळ सोडवावा.

राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनास सुरुवात केली जाईल, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे. आज सकाळी 11 वाजता या आंदोलनास सुरुवात होईल. मराठा आंदोलन हे कोल्हापूरपासून सुरु होईल. सुरु होणार असले तरी पुढे ते महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात हे आंदोलन पाच जिल्ह्यांमध्ये होईल. त्यानंतर हुळूहळू या आंदोलनाचे इतर टप्पे पार पडतील. दरम्यान, आंदोलनात सहभागी होणाऱ्यांसाठी काही नियमावलीही सादर करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मोर्चेकऱ्यांनी मौन बाळगायचे आहे. तसेच, कोरोना नियमांचे पालन करुन हे आंदोलन करायचे आहे. कोरोना संसर्ग वाढेल असे कोणतेही कृत्य करण्यात येऊ नये असा सूचना आंदोलकांना करण्यात आल्या आहेत.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत