मराठा आरक्षणाबाबत बीडमध्ये कार्यकर्त्यांची बैठक

मराठा आरक्षणाबाबत बीडमध्ये कार्यकर्त्यांची बैठक

meeting for maratha reservation

मराठा आरक्षण संदर्भात महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री सुरेश आण्णा धस यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. २८ रोजी बीड येथे होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाची तयारी संदर्भात गेवराई येथे कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली मराठा आरक्षण पिक विमा ओबीसी आरक्षण व इतर मागण्या संदर्भात भाजपाचे आमदार तथा माजी राज्यमंत्री सुरेश आण्णा धस यांनी आक्रमक भूमिका घेतली असुन सोमवारी बीड येथे चक्का जाम आंदोलनाला जास्तीत जास्त गेवराई तालुक्यातून मराठा बांधव व संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार सुरेश आण्णा धस व तसेच गेवराई चे कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार साहेब यांनी बैठकीत प्रसंगी केले आहे.

WhatsApp Image 2021 06 26 at 6.02.55 PM

यावेळी बैठकीला सभापती दिपक सुरवसे, सभापती सतीश बप्पा पवार ,मा जि. प. सदस्य सुरेशराव हत्ते. नगराध्यक्ष सुनील जवंजाळ , राजेंद्र राक्षसभुवनकर,राहुल जिजा खंडागळे,ईश्वर पवार, शाम आबा कुंड, गोपाल भैया चव्हाण, समाधान जिजा मस्के, अमोल मस्के ,बाबा खरात, सय्याजी पवार,बडू बारगजे, विठ्ठल मोटे उपस्थित होते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत