मनसे जिल्हाअध्यक्ष प्रकाश सोळंके यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मनसे जिल्हाअध्यक्ष प्रकाश सोळंके यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

परतूर (मंठा) : ज्या नागरिकांनी covid-19 लस घेऊन पूर्ण कोर्स कम्प्लीट केला आशा नागरिकांना जिल्हाबंदी करू नये मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी मा.मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे, ज्या नागरिकांनी covid-19 दोन लस घेतली त्या नागरिकांना जिल्हा बंदी करणे अयोग्य आहे,जालना जिल्ह्यातील ज्या नागरिकांनी कोरोनाची लस दोन वेळा घेऊन कोर्स कम्प्लीट केला त्या नागरिकांना माक्स लाऊण कामा निमित्त फिरण्याची परवानगी मिळा असेही आपल्या निवेदनात प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे, ते पुढे म्हणाले की covid-19या विषयावर मी आपले लक्ष वेधू इच्छितो की जालना जिल्ह्यातील ज्या नागरिकांनी दोन वेळ कोरोनाची लस घेऊन कोर्स कम्प्लीट केला, अशा नागरिकांना जिल्हा बंदी करू नये,व त्या नागरिकांना कामा निमित्त जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी कामा निमित्त फिरण्याची परवानगी मिळायला हवी, कारण covid-19 लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांने दावा केलेला आहे, कि ज्या व्यक्तीने दोन वेळा लस घेतली त्या व्यक्तीकडून इतर व्यक्तीला संसर्ग होत नाही, म्हणून ज्या लोकांनी दोन वेळा कोरोनाची लस घेतली अशा नागरिकांना कामा निमित्त फिरण्यासाठी बंधन का असावा असा सवाल हि सोळंके यांनी केला,सध्या चालू असलेल्या कोरोणावर मात करण्यासाठी राज्य सरकार आरोग्य विभाग रात्रंदिवस प्रयत्न करीत आहे, म्हणून दोन वेळा लसीकरण घेतलेला नागरिक यांना माक्स लावून कामानिमित्त फिरण्याची परवानगी दिली.

लसीकरण करून घेणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या वाढू शकते म्हणून ज्या नागरिकांना दोन वेळा लसीकरण करून घेतली त्या लोकांना कोरोनाचे सर्वांनी पाळुन फिरण्याची परवानगी द्यावी, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा जालन्याच्या वतीने मागणी करत आहोत यावरती लवकरात लवकर निर्णय घ्यावा अपेक्षा, तसेच जालना जिल्ह्यातील ज्या नागरिकांनी दोन वेळा कोरोनाची लस घेतली नागरिकांना कामानिमित्त जिल्हा व इतर ठिकाणे परवानगी मिळाल्या बाकी नागरिक सुद्धा लस घेण्यासाठी स्वताहून समोर येऊन लस करणाराला प्रतिसाद देतील म्हणून जिल्हाधिकारी जालना यांना आदेश देऊन ज्या नागरिकांनी कोरोना लस दोन वेळा घेतली अशा नागरिकांना जिल्हा बंदी करू नये व जालना जिल्ह्यातील ज्या नागरिकांनी covid-19 लस घेऊन कोर्स कम्प्लीट केलेल्या नागरिकांना जिल्ह्यात व इतर जिल्ह्यात जाण्यासाठी तत्काळ परवानगी मिळावी शेवटी असेही श्री सोळंके म्हणाले

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत