मनसे अध्यक्ष राज ठाकरे- राजकारण, समाजकारण, कला, संगित क्षेत्राचा कोलाज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे- राजकारण, समाजकारण, कला, संगित क्षेत्राचा कोलाज

राज ठाकरे यांच्या वाढदिवशी दरवर्षी कृष्णकुंजवर मोठी गर्दी असते. यंदा मात्र ही लगबग दिसत नाही. राजकारण, समाजकारण, वकृत्व, कला, संगित आणि इतर विविध विषयांचा आवाका, आवड आणि स्नेह असा कोलाज असलेल्या राज ठाकरे यांच्याविषयी.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Birthday) यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. स्वत: राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मात्र यंदा वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या पर्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करणे योग्य नाही. त्यामुळे आपण यांदा वाढदिवस साजरा करणार नाही, असे ट्विट करत राज ठाकरे यांनी आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी असे अवाहन केले असले तरी, मनसे (MNS कार्यकर्त्यांनी मात्र ‘कृष्णकुंज’च्या फाटकावर उपस्थिती लावली आणि फुलांची सजावट केली. राज ठाकरे यांच्या वाढदिवशी दरवर्षी कृष्णकुंजवर मोठी गर्दी असते. यंदा मात्र ही लगबग दिसत नाही. राजकारण, समाजकारण, वकृत्व, कला, संगित आणि इतर विविध विषयांचा आवाका, आवड आणि स्नेह असा कोलाज असलेल्या राज ठाकरे यांच्याविषयी.

राज ठाकरे यांना ‘राज’ नावाने ओळखले जात असले तरी, त्यांचे मूळ नाव हे ‘स्वरराज’ ठाकरे असे आहे. त्यांचा जन्म 14 जून 1968 या दिवशी झाला. राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे हे मोठे संगितकार, पत्रकार, व्यंगचित्रकार आणि लेखक. त्यामुळे सहाजिकच राज ठाकरे यांच्यातही हा वारसा आला. श्रीकांत ठाकरे यांचे बंधू बाळासाहेब ठाकरे हेसुद्धा मोठे व्यंगचित्रकार. श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांना वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा वारसा लाभला. बाळासाहेब ठाकरे यांचा सहावस जवळून लाभल्यामुळे राज ठाकरे यांच्यातील व्यंगचित्र आणि राजकीय नेतृत्वाचा गुण विशेष बहरला. शिवसेनेत अनेक वर्षे काम केल्यानंतर एका टप्प्यावर ते शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांनी महाराष्ट्र निवनिर्माण सेना नावाचा पक्ष (9 मार्च 2006) काढला.

Raj Thackeray Uddhav Thackeray and balasaheb thackeray

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला पदार्पणातच मोठे यश मिळाले. पहिल्या दणक्यात मनसेचे जवळपास 14 आमदार निवडूण आले. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राज ठाकरे आणि मनेसीच गंभीर दखल घेतली जाऊ लागली. मात्र, मनसेला आपला करिश्मा पुढे कायम ठेवता आला नाही. 2006 नंतर पुढे मनसेला कधीच इतके यश मिळू शकले नाही. सद्या स्थितीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेचा केवळ एक आमदार आहे. मुंबई महापालिकेतही मनसेला विशेष यश मिळवता आले नाही. मुंबई विधानसभेत मागील निवडणुकीत मनसेचे 7 नगरसेवक निवडूण आले. मात्र त्यातील 6 नगरसेवक पुढे शिवसेनेला जाऊन मिळाले. सद्या राज ठाकरे यांच्या मनसेचा केवळ 1 नगरसेवक मुंबई महापालिकेत आहे.

मनसे ट्विट

एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष असलेल्या राज ठाकरे यांना राजकारणासोबतच कलेच्या क्षेत्रात विशेष आवड आहे. त्यांना चित्रपट पाहायला आवडते. राज ठाकरे यांनीच एकदा सांगितले होते की, ते दररोज किमान एक चित्रपटतरी पाहतातच. राज यांनी मुंबईतील सर जेजे कॉलेज ऑफ आर्ट मधून शिक्षण घेतले आहे. ते प्रतिभाशाली व्यंगचित्रकार आहेत. राज ठाकरे हे जर राजकारणात नसते तर त्यांना काय करायला आवडले असते असा प्रश्न एकदा त्यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी वॉल्ट डिज्नी स्टूडियो येथे काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. एकाच वेळी राजकारण, चित्रपट, कला, संगित अशा विविध क्षेत्रात रमणाऱ्या राज ठाकरे यांनी ‘बाळ केशव ठाकरे’ नावाचे एक फोटोचरित्रही प्रकाशित केले आहे. अशा या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वास खूप खूप शुभेच्छा!

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत