मनसेने पक्षाबदल व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घ्यावी!

मनसेने पक्षाबदल  व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घ्यावी!

MNS should take a comprehensive and comprehensive role to change the party!

सध्या राज्यात राजकारणात नव्या राजकीय गणितांवर चर्चा सुरू आहे. विशेषतः भाजपा आणि मनसे युतीसंदर्भात आपल्याला अनेक रंगीत चर्चा ऐकायला मिळतात . मनसेसोबत युती करण्याबाबत भाजपा नेत्यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली . यातच मनसे आणि भाजपा एकत्र येण्याची चर्चा ही चर्चाच असावी, असे म्हणत राज ठाकरे यांनी पक्ष म्हणून व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे, असा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

images 1576481319552 Pravin Darekar

प्रवीण दरेकर यांनी संवाद साधताना सांगितले .मनसे आणि भाजपा एकत्र येणार असल्याच्या चर्चेवर प्रवीण दरेकर यांनी भाष्य केले. “राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील हे दोन्ही वरिष्ठ नेते नाशिकमध्ये आहेत. ते एकमेकांना भेटू शकतात. राज ठाकरे यांनी पक्ष म्हणून व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. आमच्या वरिष्ठ नेत्यांनीही हे मत अनेकदा व्यक्त केले आहे. मात्र, या संदर्भातील नेमकी माहिती चंद्रकांत पाटीलच देऊ शकतील”, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

राष्ट्रवादी नव्हे, अन्यायाविरोधात आक्रमक – पाटील
ईडीकडून सुरू असलेल्या कारवायांसंदर्भात भाष्य करताना पाटील म्हणाले, “ईडी ही एक केंद्रिय स्वायत्त संस्था आहे. यामुळे त्यावर काहीही भाष्य करणार नाही आणि चौकशांना घाबरायचेही कारण नाही. तसेच आम्ही राष्ट्रवादी नव्हे, तर अन्यायाविरोधात आक्रमक आहोत. राठोड प्रकरण आणि कारखान्यांच्या घोटाळ्यांसंदर्भात आम्ही आक्रमक आहोत. आम्ही महाविकास आघाडीतील कुण्याही एका ठराविक पक्षाविरोधात नाही.”

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत