‘मनसेच्या वृक्षलागवड कार्यक्रमाला आमच्या शुभेच्छा’ – ए.पी‌.आय सुभाष सानप

‘मनसेच्या वृक्षलागवड कार्यक्रमाला आमच्या शुभेच्छा’ – ए.पी‌.आय सुभाष सानप

'Our best wishes to MNS tree plantation programme' - API Subhash Sanap

आष्टी,तालुका परतुर प्रतिनिधी

नवी मुंबई- राज ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त १४ जून रोजी केलेला वृक्षलागवडीचा संकल्प त्याचाच एक भाग म्हणून दि. ७ जुलै रोजी आष्टी पोलीस ठाणे परिसरात फळाचे वृक्ष पेरू, जांभूळ पांढरे, केशर आंबा, लिंबोनी, ऑक्सिजन साठी वड, पिंपळ या वृक्षाची लागवड करण्यात आली. वृक्ष लागवड कार्यक्रम करीत असताना जालना जिल्ह्याचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके, आष्टी पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. सुभाष सानप, वैद्यकीय आरोग्य अधिकारी आष्टी डॉ. खांदारे यांच्याहस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. वृक्ष लागवड प्रसंगी वृक्षप्रेमी ए.पी.आय.सानप यांचे मनसे जिल्हा जालन्याच्या वतीने स्वागत करण्यात आले.

WhatsApp Image 2021 07 07 at 2.17.46 PM

WhatsApp Image 2021 07 07 at 2.17.44 PM

ए.पी आय. सानप यांनी मनसेच्या या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा देऊ पुढील आपल्या कार्यास सहकार्य करू असे सांगितले. या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष सोळंके म्हणाले की, “परतूर मंठा तालुक्यात महिन्याच्या प्रत्येक १४ तारखेला रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. १४ जुलै रोजी मंठा येथे रक्तदान शिबिर आहे.जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करायला हवे कारण महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे. आज महाराष्ट्रामध्ये रक्ताचा साठा 20 ते 22 हजार पिशव्या आहेत, ही खूप गंभीर बाब आहे, रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक तरुण तरुणीने रक्तदान केले पाहिजे”. वृक्ष लागवड कार्यक्रम करीत असताना मनसे तालुकाध्यक्ष कृष्णा गोवर्धन सोळंके, रामजी नवल मनसे शेतकरी सेना तालुका अध्यक्ष, आत्माराम जगताप मनसे शेतकरी सेना उपतालुका, अध्यक्ष सवईराम राठोड विभागाध्यक्ष जि.प.आष्टी, फारूक कुरेशी शहराध्यक्ष आष्टी, ज्ञानेश्वर थोरात शहराध्यक्ष आष्टी, बाळासाहेब जाधव मनसे वाहतूक सेना तालुका अध्यक्ष, अशोक कोल्हे, अनिल लहाने, महेश सोळंके, या कार्यक्रमाच्या प्रसंगी मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक पोलीस कर्मचारी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत