मधुकर फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

मधुकर फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

नवी मुंबई : नवी मुंबई येथील मधुकर फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेतर्फे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने वाशी येथील अनाथाश्रमातील मुलांना व कर्मचाऱ्यांना भोजन वाटप करण्यात आले. या अनाथाश्रमातील सर्व मुले ही एच.आय.व्ही बाधित असून अक्षय तृतीयेच्या सणानिमित्ताने या मुलांना आमरस पुरीचे जेवण मधुकर फाऊंडेशनतर्फे देण्यात आले. याप्रसंगी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर

. महेश मधुकर पाटील यांनी सांगितले की, अक्षय तृतीया या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेले दान हे अक्षय्य असते व पुराणात आजच्या दिवसाचे विविध धार्मिक संदर्भ आहेत.अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सुरू झालेले हे सेवाकार्य असेच अविरतपणे यापुढेही सुरू राहिल. समाजातील अपंग, तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक,अनाथ मुले मुली, भिकारी यांच्यासाठी फाउंडेशन तर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.

कोरोनाच्या या संकट समयी समाजातील गरजवंत घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे असे मत महेश पाटील यांनी यावेळी मांडले. याप्रसंगी संस्थेचे हितचिंतक मनोज महाजन उपस्थित होते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत