भारत_ पाकिस्तान, भारत _नेपाळ सीमा वाद आणि बरच काही……

भारत_ पाकिस्तान, भारत _नेपाळ सीमा वाद आणि बरच काही……

भारत हा नेहमीच सीमा वादा m मुळे चर्चेत राहिला आहे आता पुन्हा परत सीमा वादांमुळे तयार झालेल्या दोन देशाच्या नकाशांमुळे चर्चेत आला आहे. एकीकडे पाकिस्तान तर दुसरीकडे नेपाळ हे दोन्ही देश शेजारील देश असल्याने सीमा वाद निर्माण झालेले आहेत. खरतर भारत आणि पाकिस्तान हा विषय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलेला आहे. मग तो दहशत वादी हल्ल्याने असो, तणावपूर्ण वातावरणानी असो की विनोद निर्मिती ने असो अशा असंख्य प्रकारे तो नेहमीच चर्चेत असतो. कोणत्याही क्षेत्रातून चर्चेत असतो. क्रिडा, जवान, युद्ध, इतर अशा अनेक गोष्टींनी तो चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा भारत – पाकिस्तान विषय चर्चेत आलेला आहे. याचे कारण ही तसेच आहे, पाकिस्तानने आपला नवीन राजकिय नकाशा तयार केला आहे. त्यामधे भारतातील 4 प्रदेश हे आपल्या देशात येतात असा दावा करत ते नकाशात सामील करून घेतलेले आहेत. आतापर्यंत पाकिस्तान फक्त जमू काश्मीर राज्यासाठी युद्ध करत होते. पण या तयार केलेल्या नवीन नकाशात तर गुजरात मधील ही काही प्रदेश हा आमच्यात येतो असा दावा केला आहे. पाकिस्तानने आपल्या नवीन नकाशात जमू काश्मीर, जुनागड, लडाख हे प्रदेश आपल्या नवीन नकाशात त्यांनी सामील करून घेतले आहेत. याचे स्पष्टीकरण देताना परराष्ट्र मंत्री म्हणाले की गुजरात येथील जुनागड येथे मुस्लिम लीगचे तिसरे संस्थापक मोहम्मद खान यांचे वर्चस्व होते. त्यामुळे हा प्रदेश पाकिस्तान मध्ये सामील होतो. पण खरतर पाहिले तर फेब्रुवारी 1948 मध्ये गुजरात राज्याची स्थापना झाली. तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी तेथील लोकांचे जनमत घेण्याचे सांगून भारतात रहायचे की पाकिस्तान हा निर्णय घेतला होता. पण त्यावेळी तेथील मुस्लिम लोकाना भारतातच रहायचे होते. 1948 साली संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार सर्व वादग्रस्त प्रदेशाचा निर्णय झाला होता त्यावेळी भारताने मंजुरी दिली होती. असे मत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी व्यक्त केले. यासोबतच आमच लक्ष श्रीनगर आहे आणि देशातील जनतेच्या प्रेमापोटी आम्ही ते पूर्णच करणार असे मत व्यक्त केले. खरतर या नवीन नकाशाला भारताने येवढे मनावर घेतलेले नाही. कारण कलम 370 च्या बाबतीत बरोबर 1 वर्षानंतर पाकिस्तानने उचलेले पाऊस आहे. त्याचा बदला म्हणायला याला हरकत नाही. ठीक आहे हे भारत पाकिस्तान ये काही आपल्या सर्वांसाठी काही नवीन नाही. पाकिस्तान बरोबर अजून एका देशाने आपला नवीन
नकाशा तयार केलेला आहे.
पाकिस्तान चे झाल ओ तो कितीही नाही म्हटले तरी दुश्मन देश आहे. पण नेपाळ हा देश तर भारत आणि नेपाळ असे दोन भाऊ असल्यासारखे यांचे नाते आहे. असे एकदम जवळचे नाते असताना नेपाळ आणि भारतात सीमा वाद होतो म्हणजे सर्वाना आश्चर्य नाही वाटले तरच नवल याच कारण अस की नेपाळ हा भारताचा अत्यन्त महत्वाचा असा शेजारील देश आहे. भारत आणि नेपाळचे संबध सर्वच बाबतीतील खूप जवळचे आहेत. नेपाळ येथील लुंबिनी येथे गौतम बुद्धांचा जन्म झालेला आहे. दोन्ही देशातील हिंदुत्व आणि बौद्धत्व येवढ्या समान पातळीवर आहे की त्यांचे वर्णन “रोटी बेटी का रिश्ता” या वाक्यात केले जाते. यांच्यातील संबंध चांगले होते ते अजून चांगले होण्यासाठी दोन्ही देशात 1950 मध्ये “शांतता मैत्री” करार झाला. या करारानुसार निवासस्थान, मालमत्ता, व्यवसाय, या संबंधी दोन्ही देशातील नागरिकांनी व्यवहार करण्यावर चर्चा झाली तसेच आयात आणि निर्यात धोरणावर आपलेपणा असेल, या करारानुसार भारताने नेपाळला शस्त्रास्त्रची मदत केली. भारत आणि नेपाळ मध्ये सर्वच उद्योग संस्था मध्ये मोठी भागीदारी आहे. 2019 मध्ये भारताने नेपाळला “अरुण 3” या जलविद्युत प्रकल्पासाठी 1236 रुपये कोटींची मदत केली होती. यासोबतच भारताने नेपाळ बरोबर “थ्री सिस्टर सीटी अग्रीमेंट” केले आहे. भारताचे उत्तराखंड, पाश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, सिक्कीम आणि आसाम हे पाच राज्य नेपाळ राज्याला लागून आहेत. येवढे चांगले संबंध या दोन्ही देशांचे आहेत.
लिपुलेख, लिम्पिधारा आणि कालापानी या प्रदेशावरून भारत आणि नेपाळ यांच्यामधे सीमावादाला चेतावणी मिळाली. तस पाहिले तर हा वाद सुमारे 204 वर्षापासुन चालू आहे. शाब्दिक लढाई सुरू होती यावरुन. या वादाला सुरवात झाली 1816 मध्ये या साली ब्रिटिशांनी भारत आणि नेपाळ सीमेजवळील भाग नेपाळ राजाला पराभूत करून ताब्यात घेतला, यानंतर ब्रिटिश राज्यकर्ते व नेपाळच्या सत्ताधाऱ्यांमध्ये “सुगौलीचा तह” झाला. या तहामध्ये नेपाळने सिक्कीम, नैनीताल, दार्जिलिंग, लिपुलेख, कालापानीचा प्रदेश ब्रिटीशांना म्हणजेच भारताला स्वाधीन केला. अस म्हणतात ना चांगल्या दोघात तिसरा आला की दोघंचे संबंध खराब होतात त्यात तो एकाचा दुश्मन असेल तर अजून वाद चिघळतात. याचप्रमाणे या दोन्ही देशात भारताचा दुश्मन असलेला चीन हा देश मध्ये आला. नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर डावी विचारसरणी आहे तेथील पंतप्रधान के. पी. ओली हे पण डाव्या विचारसरणी असलेली आहेत. नेपाळचा चीन सोबत करार झाला त्यानुसार चीनचे शिंयाजीन, शेंजेना, लिआनीभुगंग आणि श्यांजीयांन हे चार बंदरे नेपाळ ला वापरण्याची परवानगी देण्यात आली. तसेच बी. आर. आय रेल्वे मार्गासंदर्भात प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. भारताचे लष्करप्रमुख एम एम नरवणे यांच्या मतानुसार नेपाळला भारताविरुद्ध हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे खर आहे की खोट सांगता येत नाही. नेपाळच्या लिपुलेख, कालापानी, लिपियाधारा हे प्रदेश परत मिळविण्यासाठी राजनैतिक पावलं उचलली जातील अस नेपाळचे राष्ट्राध्यक्षा विद्या देवी भंडारी यांनी सांगितले. नेपाळच्या सरकारी धोरणी कार्यक्रमात देशाचा नवीन नकाशा मांडला त्यात त्यांनी लिपुलेख, कलापाणी आणि लिपियाधारा हे प्रदेश दाखवलेले आहे. नेपाळ मधील पहाडी समाजाच्या मनात भारतीयांविषयी तीव्र संताप आहे. त्यांच्या नवीन नकाशा संदर्भात स्पष्टीकरण देताना ते म्हणतात की 1960 पासून सीमावर्ती लष्कर तैनात केली आहे त्यामुळे तिथून लोकाना येता जाता येत नाही तसेच काली नदीचा उगम हा कालापानी येथे होतो. ती भारताने आपल्या नकाशात दाखवला आहे, तसेच भारताने कालापानी संदर्भात “सुगौली कराराचे” उल्लंघन केले. असे अनेक आरोप त्यांनी या संदर्भात केले. या सर्व सीमा वादावरुण नेपाळने 7 प्रदेश, 77 जिल्हे, आणि आणि ते तिन्ही प्रदेश मिळून 753 स्थानिक संस्थानचा मिळून नवीन नकाशा तयार केला.
अशा भारताच्या दोन्ही शेजारील देशांनी आपापले नवीन नकाशे जारी केल्याने भारतावर आणि या दोन्ही देशांवर कोणते परिणाम होतील याचे अंदाज लावता येणार नाही. पण नेपाळ आणि भारत यांच्यामधे जर युद्ध झाले तर नेपाळच्या तुलनेत भारताकडे मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा आहे. अशा वेळी चीन 100 टक्के नेपाळला मदत करणार. त्यामुळे सर्वच स्थिती ही भयाण होण्याच्या मार्गावर असेल. पाकिस्तानच्या बाबतीत बोलायला गेले तर तो दुश्मन आहे. त्याच्या नकाशा बाबत भारताने मनावर घेतलेले नाही. यानंतर भारताची भूमिका काय असेल ते पाण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. फक्त एकच आशा आहे की या कोरोना रोगांच्या संकटात अजून युद्ध स्थिती निर्माण होणारे संकट नको आहे.

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत