भारतीय सघांतील खेळाडूने कोरोना लढ्यात दिले मोठे योगदान

भारतीय सघांतील खेळाडूने कोरोना लढ्यात दिले मोठे योगदान

महाराष्ट्र : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना ठीक ठिकाणी बेडस उपलब्ध नाहीत तर काही ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याचे दृश्य दिसत आहे. त्यामुळे ह्या काळात एकमेकांना मदत करून रुग्णांना मोफत वैद्यकीय तपासणी किंव्हा त्यांना उपचारासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी अनेक भारतीय क्रिकेट संघाचे अनेक खेळाडू, कर्णधार ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन मोलाचे काम केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज प‌ॅट कमिन्स यांनी सोमवारी भारताला कोरोना लढाईत मदतीचा हात म्हणून जवळपास ३० लाख रुपये PM CARE FUND मध्ये दान केले आहेत आणि त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

कोरोनावर मात केल्यानंतर प्लाझ्मा दान करण्याचा संकल्प करणाऱ्या महान फलंदाज सचिन तेंडुलकरने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायत्ता निधीत प्रत्येकी २५ लाखांची मदत केली.

तसेच भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी दोघांनी मिळून पंतप्रधान व महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायत्ता निधीत ३ कोटींचा हातभार लावला आहे.

pjimage 1 15

चेन्नई सुपरकिंग आणि भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने ५२ लाखांची मदत केली. यापैकी ३१ लाख हे पंतप्रधान सहायात्ता निधीत तर २१ लाख उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सहायत्ता निधीत जमा केले.

टीम इंडियाचा कसोटी संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणेने मुख्यमंत्री सहायत्ता निधीत १० लाखाची मदत केली.

352195 ajinkya3

भारताचा माजी सलामीवीर खासदार गौतम गंभीरने त्यांच्या फंडातून १ कोटीची मदत दिल्ली सरकारला केली. शिवाय त्याचा दोन वर्षांचा पगार सुद्धा त्यांना दान केला. त्याव्यतिरिक्त दिल्लीतील गरजूंना तो एक रुपयात जेवण देत आहे.

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने ५० लाख रुपयांचे तांदूळ गरजूंना दान केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यांच्या सलग्न संघटनांसह ५१ कोटींची मदत केली. तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने देखील राज्य सरकारला ५० लाखांची मदत केली. शिवाय बीसीसीआयच्या फंडातही ५० लाख दिले.

रोहित शर्माने पंतप्रधान सहाय्यता निधीत ४५ लाखांची मदत केली. तसेच त्याने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी २५ लाख रुपये दिले. याशिवाय Zomato Feeding India आणि भटक्या कुत्र्यांसाठी कार्य करणाऱ्या Welfare Of Streays Dogs या संस्थेला प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली.

तसेच इरफान व युसुफ पठाण या बंधूंनी गरजूंना अन्न धान्य पुरवण्याचे काम केले.

275585 209180 irfan pathan1

शिखर धवन, शेल्डन जॅक्सन, युवराज सिंग, रवींद्र जडेजा, हरभजन सिंग यांनीही त्यांच्या
परीने मदत केली.

भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिन १० लाखांची मदत केली.

DAVh1C8UAAATkJm 990x556 1

तसेच महान खेळाडू सुनील गावसकर यांनीही ५९ लाखांची मदत केली.

OIP 2 1

महेंद्र सिंग धोनी याने देखील हातावर पोट असलेल्या मजुरांसाठी मदत केली.

सिंह धोनी 1

ऑलिम्पिक रौप्यपदक बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधून आध्र प्रदेश आणि तेलगणा राज्याच्या मुख्यमंत्री सहायत्ता निधीत ५ लाखांची मदत केली. सुपर मॉम बॉक्सर मेरी कोमन तिचा एक महिन्याचा पगार आणि खासदार फंडातून १ कोटींची मदत केली.

भारताचा कुस्तीपटू बजरंग पूनियान त्यांचा सहा महिन्याचा पगार दिला. १६ वर्षीय भारतीय महिला क्रिकेटपटू रीचा घोषन १ लाखांची मदत केली. भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने उभ्या केलेल्या चळवळीतून १.२५ कोटी जमा केले. तसेच गोल्डन गर्ल हिमा दासने तिचा एक महिन्याचा पगार दान केला.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत