भारतीय मूळचा ‘हा’ 20 वर्षीय युवा पठ्ठा किवी संघाच्या ताफ्यात, नावात राहुल द्रविड-सचिन तेंडुलकरचे आहे अनोखे मिश्रण

भारतीय मूळचा ‘हा’ 20 वर्षीय युवा पठ्ठा किवी संघाच्या ताफ्यात, नावात राहुल द्रविड-सचिन तेंडुलकरचे आहे अनोखे मिश्रण

भारत आणि न्यूझीलंड संघ 18 जूनपासून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात भिडणार आहेत. 21 वर्षीय फलंदाज रचीन रविंद्र याला किवी संघात स्थान देण्यात आले आहे. न्यूझीलंडच्या 20 सदस्यीय संघात आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेला रचिनचे एक मजबूत भारतीय कनेक्शन आहे. त्याचा जन्म वेलिंग्टनमध्ये भारतीय कुटुंबातच झाला आहे.

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघ 18 जूनपासून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (ICC World Test Championship Final) सामन्यात भिडणार आहेत. विजेतेपदाच्या सामन्यासाठी न्यूझीलंडने त्यांच्या संघात भारतीय वंशाच्या खेळाडूलाही संधी दिली आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका आणि टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यासाठी 21 वर्षीय फलंदाज रचीन रविंद्र (Rachin Ravindra) याला किवी संघात स्थान देण्यात आले आहे. न्यूझीलंडच्या 20 सदस्यीय संघात आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेला रचिनचे एक मजबूत भारतीय कनेक्शन आहे. त्याचा जन्म वेलिंग्टनमध्ये (Wellington) भारतीय कुटुंबातच झाला नाही तर गेल्या काही वर्षांपासून तो ऑफ सीझन दौर्‍यावर भारतात नियमितपणे खेळत आहे. रचिन हा भारतीय वंशाचा खेळाडू आहे आणि वडील रवि कृष्णमूर्ती आणि आई दीपा कृष्णमूर्ती वेलिंग्टन येथे स्थायिक आहेत.

रचिनचा जन्म वेलिंग्टनमध्ये 1999 मध्ये झाला होता आणि वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी त्याने प्लास्टिकच्या बॉलने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. रचिनच्या नावाची विशेषता म्हणजे त्याच्या नावात सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचे मिश्रण आहे. रचिनचे वडील रवि कृष्णमूर्ती यांनी द्रविडच्या नावातील ‘र’ आणि सचिन तेंडुलकरच्या नावातील ‘चिन’ हे शब्द एकत्र करून ‘रचिन’ नाव ठेवले आहे. रचिनचे वडील हे माजी भारतीय गोलंदाज आणि सामना अधिकारी जवागल श्रीनाथ यांचे खूप चांगले मित्र आहेत. दोघांनी बेंगलोर येथे एकत्र क्रिकेट खेळले आहे. रचिनचे वडील त्याच्या कामगिरीबद्दल नेहमीच श्रीनाथसोबत चर्चा करत असतात.

दरम्यान, रचिनच्या क्रिकेट कामगिरीबद्दल बोलायचे तर तो वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी किवी संघाकडून 2018 अंडर 19 वर्ल्ड कप खेळला आहे. रचिनच्या प्रथम श्रेणी आणि लिस्ट A क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचे तर त्याच्या नावर एकूण चार शतकांची नोंद आहे. याशिवाय त्याने चेंडूने प्रथम श्रेणीमध्ये 22, लिस्ट A मध्ये 8 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 19 विकेट्स घेतल्या आहेत. आणि आता त्याला वरिष्ठ भारतीय संघाविरुद्ध मोठ्या टप्प्यावर चमकण्याची पहिली संधी मिळेल. भारताविरुद्ध 18 जूनपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात रचिनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास तो या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण करेल.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत