भारतीय महिला ब्रिगेडचं दमदार कमबॅक

भारतीय महिला ब्रिगेडचं दमदार कमबॅक

Strong comeback of Indian Women's Brigade

भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 8 धावांनी विजय मिळवला आहे. विजयासह टीम इंडियांना तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर 149 धावांचं लक्ष्य ठेवलं होते. या लक्षाचा पाठलाग करताना इंग्लंडला 20 षटकांत 140 धावाच करता आल्या. इंग्लंडकडून टम्सिनने चांगली फलंदाजी केली. तिने 50 चेंडूत 59 धावा केल्या. इंग्लंडची सुरुवात खराब झाली. इंग्लंडची पहिली विकेट 13 धावांवर गेली. त्यांनतर 106 वर 3 अशा भक्कम स्थितीत इंग्लंडचा संघ होता. मात्र त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी पटापट विकेट सोडली. नाइट, डंकले, जोन्स, ब्रंट, विलियर्स एका मागोमाग आऊट झाले. इंग्लंडकडून टॅमी बीमाँटने सर्वाधिक 59, कर्णधार हेथर नाईटने 30, तर अॅमी जोन्सने 11 धावा केल्या. भारताकडून पूनम यादवने दोन, तर अरुंधती रेड्डी, दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

त्याआधी भारताने पहिल्या विकेटसाठी शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी चांगली खेळी केली. पहिल्या विकेटसाठी त्यांनी 70 धावांची पार्टनरशिप केली. स्मृती मानधना16 चेंडूत 48 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यानंतर संघाची धावसंख्या 72 असताना शेफाली वर्मा बाद झाली. तिनेही 38 चेंडूत 48 धावा केल्या. त्यानंतर हरमनप्रीत कौर आणि दिप्ती शर्मानं संघाची बाजू सावरली. मात्र संघाची धावसंख्या 112 असताना हरमनप्रीत बाद झाली. तिने 25 चेंडूत 31 धावा केल्या. रिचा घोष ८ धावा करून बाद झाली. दीप्ती शर्मा नाबाद 24, तर स्नेह राणाने नाबाद 8 धावा केल्या. अशारीतीने भारताने 20 षटकांत इंग्लंडसमोर 149 धावांचं लक्ष्य ठेवलं. इंग्लंडकडून स्कायव्हर, डेविज, साराह ग्लेन, मॅडी विलर्स यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत