भारतीय प्रजासत्ताक दिन

भारतीय प्रजासत्ताक दिन

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवसाला गणराज्य दिन म्हणूनही संबोधले जाते.

भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर इ. स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ. स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले.

जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर इ. स. १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती.

त्या घटनेची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.

या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण करून त्याला मानवंदना दिली जाते.

भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे.

या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती.

अश्या या प्रजासत्ताक दिनाची थोरवी सातासमुद्रापार गाजत राहावी हीच आम्हा देशवासियांची भावना आहे.

विजयी विश्व तिरंगा न्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा🇮🇳

:- ईश्वरी मुरुडकर

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत