भारताला राहुल द्रविड यांनी बनवले आहे वर्ल्ड चॅम्पियन, या गुणांमुळे BCCI ‘सुपरहिट’ प्रशिक्षकावर लावू शकते दाव

भारताला राहुल द्रविड यांनी बनवले आहे वर्ल्ड चॅम्पियन, या गुणांमुळे BCCI ‘सुपरहिट’ प्रशिक्षकावर लावू शकते दाव

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्रीच्या अनुपस्थितीत भारताचे माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविड श्रीलंका दौऱ्यावर भारताच्या B संघाला प्रशिक्षण देताना दिसु शकतात. पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल सारख्या अनेक युवा खेळाडूंच्या कारकीर्दीत अनेक बदल केल्याचे श्रेय द्रविडला जाते. त्यांच्या आतापर्यंतच्या कोचिंग कारकिर्दीतील काही महत्त्वाच्या ठळक बाबींचा आढावा खालीलप्रमाणे आहे.

टीम इंडियाचे (Team India) मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या अनुपस्थितीत भारताचे माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविड (Rahul Dravid) आगामी श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour) भारताच्या B संघाला प्रशिक्षण देताना दिसु शकतात. यंदा जुलै महिन्यात द्रविड श्रीलंका दौर्‍यावर संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावताना दिसु शकतो. या दरम्यान, मुख्य भारतीय संघ (Indian Team) विराट कोहलीच्या नेतृत्वात कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर असेल. शिवाय शास्त्री देखील त्यांच्या सोबत असतील अशा परिस्थितीत बीसीसीआय द्रविडच्या नेतृत्वात श्रीलंकेविरुद्ध मर्यादित ओव्हरच्या मालिकेसाठी आणखी एक संघ पाठवेल. मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविड पहिल्यांदा ज्येष्ठ भारतीय संघासह प्रवास करेल. यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख द्रविडने 2014 इंग्लड दौऱ्यावर टीम इंडियाचा फलंदाजी सल्लागार म्हणून काम केले होते.

शिवाय, त्यांनी अंडर-19 भारत अ संघातही पूर्वी काम केले होते. पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, ईशान किशन आणि शुभमन गिल यांच्यासारख्या अनेक युवा खेळाडूंच्या कारकीर्दीत अनेक बदल केल्याचे श्रेय द्रविडला मिळाले आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या कोचिंग कारकिर्दीतील काही महत्त्वाच्या ठळक बाबींचा आढावा खालीलप्रमाणे आहे.

अंडर-19 विश्वचषक 2016 (उपविजेते)

2015 मध्ये भारत अंडर-19 आणि A संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतलेल्या द्रविड समोर पहिले मोठे आव्हान वर्ल्ड कपच्या रूपात आले. 2016 अंडर-19 विश्वचषकात इशान किशनच्या नेतृत्वाखालील भारताने लीगच्या टप्प्यात आयर्लंड, न्यूझीलंड आणि नेपाळविरुद्ध विजय मिळवून दमदार सुरुवात केली. त्यानंतर भारताने उपांत्यपूर्व फेरीत नामिबिया आणि सेमीफायनल सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघ आशावाद असतांना किशनच्या नेतृत्वातील संघाला वेस्ट इंडीज विरोधात पाच विकेटने पराभव पत्करावा लागला.

भारत अ संघाबरोबर काम

अ संघाकडून वरिष्ठ राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी द्रविडला अनेक युवा खेळाडूंनी श्रेय दिले. द्रविडच्या नेतृत्वात मयंक अग्रवाल, रिषभ पंत आणि हनुमा विहार यांच्यासारखे इतर खेळाडू द्रविडच्या प्रशिक्षणपदी असताना भारत अ संघात होते. 2018-19 मध्ये भारताच्या A टीम सोबत इंग्लंड आणि न्यूझीलंडचा दौरा केला. यानंतर त्याला ऑस्ट्रेलिया विरोधात बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली जिथे त्याने शानदार अर्धशतकी खेळीसह प्रभावित केले.

अंडर 19 विश्वचषक 2018 (चॅम्पियन)

मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडने सर्वात मोठी उपलब्धी 2018 मध्ये आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये मिळवले जेव्हा पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वात संघाने विजेतेपद पटकावले. हाय-व्होल्टेज सेमीफायनल सामन्यात पाकिस्तानला पराभूत करण्यापूर्वी भारताने साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे आणि बांग्लादेशचा पराभव केला. शॉच्या नेतृत्वात टीमचा फायनलमध्ये सामना ऑस्ट्रेलियाशी झाला आणि त्यांनी सलग दुसरा मिळवून विजेतेपदावर आपले नाव कोरले. विश्वचषक स्पर्धेमुळे शॉ, शुबमन गिल, शिवम मावी आणि कमलेश नगरकोटी यांच्यासारखे देशाला स्टार खेळाडू दिले.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत